
किल्ला परिसरातील सावरकर मैदानावर खाद्य पदार्थांच्या चारचाकी गाड्या लागल्या होत्या. महापालिकेच्या जनता दरबारात त्याच्या विरोधात तक्रारी आल्यानंतर त्यावरील अतिक्रमणे हटवण्यात आली. ही पार्किंगसाठी आरक्षित असताना महापालिकेने त्यावर 80 टक्के व्यवसायासाठी
.
या मैदानावर दिवसभर खाद्य पदार्थांच्या चारचाकी गाड्या लागत होत्या. परिसरातील रहिवाशांना त्रास होत होता. कचरा वाढला, टवाळखोरी वाढली. त्यामुळे सर्व गाड्या हटवण्यात आल्या. त्यानंतर महापालिकेने ही जागा कोणाची आहे याचा शोध घेतला. तर पार्किंगसाठी आरक्षित असल्याचे निदर्शनास आले. नवी पेठमध्ये कुठेही पार्किंगची सोय नाही. त्यामुळे नवी पेठेत खरेदीला जाणारे ग्राहक याच मैदानावर चारचाकी पार्क करून जात आहेत. महापालिकेने याच मैदानावर स्ट्रीज बझार करू पाहात आहे. होम मैदानाच्या बाजूला आपत्कालीन मार्गच्या धर्तीवरील स्ट्रीट बझार करून खाद्य पदार्थांच्या स्टॉलसाठी जागा देण्याचा विचार करत आहे. अर्थातच 80 टक्के जागेवर व्यवसाय आणि 20 टक्के जागा पार्किंगसाठी सोडायची, असे ठरवू पाहात आहेत. तसे झालेच तर पार्किंग कुठे करणार? असा प्रश्न आहे. त्यावर महापालिका प्रशासनाचे कोणतेही उत्तर नाही. परंतु महापालिकेने घातलेला घाट उधळून लावण्यासाठी नागरी दबाव आवश्यक आहे.
व्यापारी, ग्राहकांनी आवाज उठवला तर जागा सुरक्षित
अतिक्रमणांचा कैवार असणाऱ्या पुढाऱ्यांच्या दबावाखाली प्रशासन असेल तर त्यावर नागरी दबाव हाच पर्याय आहे. नवी पेठ व्यापारी असोसिएशन आणि ग्राहकांनी महापालिका आयुक्तांची भेट घेऊन त्यांच्यावर दबाव आणला तरच पार्किंगची जागा टिकून राहील अन्यथा पुन्हा अतिक्रमणच होईल. पार्किंगला जागा मिळणार नाही.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



