
Sindhudurg District Original Name: सिंधुदुर्ग जिल्ह्या हा महाराष्ट्रातील निसर्गसौंदर्याने नटलेला व समृद्ध असा जिल्हा आहे. 1 मे हा राज्यभरात महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. पण तुम्हाला माहितेया का आजच्याय दिवशी सिंधुदुर्ग जिल्ह्याची स्थापना झाली होती. 1 मे 1981 साली सिंधुदुर्ग जिल्ह्याची स्थापना झाली. पण त्या आधी वेगळ्याच नावाने सिंधुदुर्ग जिल्हा ओळखला जात होता.
सिंधुदुर्ग जिल्हा हा सागरी किनाऱ्यावर वसला आहे. पर्यटन, मासेमारी, आंबा, काजू, फणस हे तेथील प्रमुख व्यवसाय आहेत. लांबच लांब सागरी किनारा लाभल्याने येथे पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. निळाशार समुद्र, समृद्ध जंगल आणि निसर्गसौंदर्य यामुळं सिंधुदुर्ग जिल्हा कायमच पर्यटकांचे आकर्षणाचे स्थान आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक किल्ले आहेत. जिल्ह्यात 38 किल्ले असून त्यात जलदुर्ग, गिरीदुर्ग, भुईकोट या तिन्ही प्रकाराचे किल्ले असणारा एकमेव जिल्हा आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याला प्राचीन इतिहास लाभला आहे. महाभारत आणि रामायणातही या जिल्ह्याचा उल्लेख सापडतो. भगवान श्रीकृष्ण कालयवन या द्रविड राजास द्वारकेपासून हुलकावणी देत मुचकुंद राजाच्या गुहेत लपून बसले व कालयवनाचा वध झाल्यावर या जिल्ह्याच्या उत्तरेकडून घाट उतरून करवीरला गेले अशी आख्यायिका आहॆ. रामायणातही या प्रदेशाचा उल्लेख आहे. जिल्ह्यातील नेरूर येथे सापडलेल्या शिलालेखावरून या परिसरात चालुक्यांची सत्ता नांदली असा निष्कर्ष काढला येतो.
सिंधुदुर्गाची स्थापना
या जिल्ह्याची स्थापना 1 मे 1981 साली करण्यात आली. मात्र त्याआधी या जिल्ह्याचे नाव दक्षिण रत्नागिरी असं होतं. ते बदलून सिंधुदुर्ग ठेवण्यात आले. शिवाजी महाराजांनी कुरटे बेटावर बांधलेला सिंधुदुर्ग हा जलदुर्ग ह्या जिल्ह्यात आहे त्यावरुनच हे नाव ठेवण्यात आले. १९९९ साली सिंधुदुर्ग जिल्हा हा भारतातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन स्थळे
आचरा खाडी (बॅकवाटर)
आंबोली – थंड हवेचे ठिकाण
कुणकेश्वर मंदिर (देवगड)
तेरेखोल किल्ला
देवगड किल्ला व दीपगृह
राजवाडा (सावंतवाडी)
मोतीतलाव, सावंतवाडी
विजयदुर्ग किल्ला
संत राऊळ महाराज मठ कुडाळ
पाट तलाव (पाट)
सावडाव धबधबा
सिंधुदुर्ग किल्ला
जय गणेश मंदिर मालवण
श्री दत्त मंदिर, माणगाव
धामापूर तलाव, धामापूर मालवण
यशवंतगड किल्ला, रेडी
पांडवकालीन द्विभूज गणपती, रेडी
वेंगुर्लाबंदर
वेंगुर्ला दिपगृह
मालवण रॉकगार्डन
पवनचक्की, देवगड
आई भराडीदेवी मंदिर, आंगणेवाडी
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.