
Thackeray Vijayi Melava Teaser: राज्य सरकाराने हिंदी भाषा शिकवण्यासंदर्भातील जीआर रद्द केल्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आपला नियोजित मोर्चा रद्द केला आहे. मोर्चाऐवजी ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा पार पडणार आहे. वरळीमध्ये 5 जुलै रोजी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि मनसेमधील नेते, कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. दुसरीकडे दोन्ही पक्षांच्या नेत्यांमधील होणारी जवळीक पाहता युतीची घोषणा होऊ शकते अशी शक्यता व्यक्त होत आहे.
5 जुलै रोजी होणाऱ्या विजयी मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मनसेचे नेते सचिन मोरे यांनी एक टीझर शेअर केला आहे. यामधूनही त्यांनी दोन्ही भावांची युती होण्याचे संकेत दिले आहेत. या व्हिडीओतून त्यांनी शब्दांच्या माध्यमातून एक गोष्ट सांगितली आहे.
व्हिडीओत काय आहे?
व्हिडीओत सिंहावर हल्ला होता, दुसरा सिंह त्याच्या मदतीला धावताना दिसत आहे. सचिन मोरे यांनी हे सिंह म्हणजे ठाकरे बंधू असल्याचं म्हटलं आहे.
“काही रानकुत्र्यांनी जंगलात उच्छाद मांडला होता. एकदा सिंहाला एकटं पाहून रानकुत्र्यांनी डाव साधायचं ठरवलं. मग रानकुत्र्यांनी झुंडीने त्या सिंहावर हल्ला चढवला. तो सिंह निकरीने, जिद्दीने त्या रानकुत्र्यांशी झुंजत होता. ते सर्व त्या सिंहाच्या भावाने पाहिलं. तोही या लढाईत सामील झाला. त्या दोन भावांनी हिंस्त्र झुंडीला पळवून लावलं. आणि दोन लढवय्या भावांच्या शक्तीने जंगल रानकुत्र्यांच्या झुंडीपासून मुक्त झालं. या गोष्टीचा अर्थ महाराष्ट्राला समजला असेलच. हीच लढवय्या भावांची गोष्ट प्रत्य़क्ष अनुभवण्यासाठी या. मराठी माणसाची ठाकरी गर्जना ऐकायला डरकाळी फोडत या,” असं त्यांनी व्हिडीओतून म्हटलं आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.