
येथील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या कोटमगाव रोडवरील वीज उपकेंद्राच्या परिसरात असलेल्या सोलर प्रकल्पाजवळ वाढलेल्या गवताला सोमवारी दुपारच्या सुमारास आग लागली होती. आगीची माहिती मिळताच शहरात कार्यरत असलेल्या सिद्धवीर हनुमान मित्रमंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी तयार केलेल्या अग्निशमन टँकरद्वारे पाणी मारून आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला आहे. वीज वितरण कंपनीचा कोटमगाव रोड येथे मोठा सोलर प्रकल्प उभारण्यात आलेला आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात गवत वाढलेले आहे. याच गवताला सोमवारी अचानक आग लागल्याने सोलर प्लांट धोक्यात आला होता. धुराचे मोठे लोळ या ठिकाणी बाहेर पडू लागल्याने { उर्वरित पान. ३
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



