digital products downloads

सिपना महाविद्यालयातर्फे आज शिव महोत्सव: बुलेटस्वार विद्यार्थिनींची रॅली, सकाळी 10 वाजता प्रारंभ – Amravati News

सिपना महाविद्यालयातर्फे आज शिव महोत्सव:  बुलेटस्वार विद्यार्थिनींची रॅली, सकाळी 10 वाजता प्रारंभ – Amravati News



अमरावती येथील सिपना अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे आज शिव महोत्सव साजरा केला जात आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या महोत्सवाचे प्रमुख आकर्षण बुलेटस्वार विद्यार्थिनींची रॅली, ध्वजधारी मावळे, लाठी-काठीचे प्रात्यक्षिक आणि शिवबांचा चित्ररथ असल्याची माहिती प्राचार्य डॉ. संजय खेरडे यांनी दिली. सिपना अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे दरवर्षी स्नेहसंमेलनाला जोडून शिव महोत्सव साजरा केला जातो. यावर्षीचे हे आठवे आयोजन आहे. या महोत्सवाचा प्रारंभ सकाळी १० वाजता सायंस्कोर मैदानातून निघणाऱ्या रॅलीने झाला. या रॅलीच्या अग्रभागी विद्यार्थ्यांचे ढोल पथक होते. मध्यभागी खुल्या जीपवर संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री जगदीश गुप्ता, शिवाजी महाराजांच्या वेशात विद्यार्थी मेहरदीप पारखे, माँ जिजाऊच्या रूपात विद्यार्थिनी ईशा डंबाले आणि सईबाईच्या भूमिकेतील उन्नती चौधरी असा चित्ररथ होता. ही रॅली सायन्सकोर मैदान येथून निघाल्यानंतर शिवटेकडी मार्गे गर्ल्स हायस्कूल चौक, गणेशदास राठी विद्यालय, इर्विन चौक, जयस्तंभ चौक असे मार्गक्रमण करत राजकमल चौकात पोहोचली. याठिकाणी उड्डाणपुलावरून पुष्पवृष्टी करण्यात आली, तसेच चौकात लाठी-काठीचे प्रात्यक्षिक सादर केले गेले. यावेळी ढोल पथकाचे वादन आणि फ्लॅश मॉबही आयोजित करण्यात आला होता. या रॅलीचा समारोप महाविद्यालयाच्या परिसरात होणार असून, त्यानंतर कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचे अधिव्याख्याता व शिवचरित्रकार प्रा. गजानन देशमुख यांचे ‘मी रायगड बोलतोय’ या विषयावर व्याख्यान होईल. माध्यमांशी झालेल्या संवादावेळी प्राचार्य डॉ. खेरडे यांच्यासह संस्थेचे उपाध्यक्ष अजयभाई श्रॉफ, शिव महोत्सवाचे प्रभारी प्रा. अमित शाह, समन्वयक स्नेहल वासनकर, विश्वस्त अरुण लवणकर, प्रा. संजय मालाणी आणि रवी इंगळे आदी मान्यवर उपस्थित होते.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp