
सिल्लोड तालुक्यात शनिवारी दुपारच्या सुमारास वीज कोसळून चार शेतककऱ्यांचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली. वीज कोसळल्याने दोन सख्खे भाऊ, दोन इतर व्यक्ती आणि चार जनावरे जागीच ठार झाली. तर एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. शेतकरी पेरणीच
.
पहिली घटना मोढा बुद्रूक येथील असून, दुपारी दोनच्या सुमारास रंजना बापू शिंदे (वय 50) या शेतातून घरी परतत असताना विजेचा कोसळल्याने जागीच मृत्युमुखी पडल्या. दुसरी घटना पिंपळदरी येथे घडली. पिंपळदरी येथील शेतकरी शिवराज सतीश गव्हाणे वय 28 वर्षे या तरूण शेतकऱ्याचा मृत्यू झाला. तर त्याचा भाऊ जिवन सतीश गव्हाणे वय 20 वर्षे हा तरुण गंभीर जखमी झाला आहे.
सारोळ्यात दोन सख्ख्या भावांचा मृत्यू
तिसरी घटना सारोळा (ता. सिल्लोड) शिवारात घडली. गट क्रमांक 294 मध्ये वीज कोसळून रोहित राजू काकडे (वय 21) व यश राजू काकडे (वय 14) या दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला. दोघे भाऊ पेरणीसाठी शेतात गेले असता, पावसाला सुरूवात झाल्याने ते झाडाखाली आसरा घेण्यास थांबले. त्यावेळी तिथे वीज कोसळली आणि त्यांचा मृत्यू झाला. दोन मुलांचा मृत्यू झाल्याने आई-वडिलांवर दुखाचा डोंगर कोसळला असून गावात शोककळा पसरली आहे.
वीज कोसळून 4 जनावरांचा मृत्यू
या नैसर्गिक संकटात चार जनावरांचाही बळी गेला आहे. अन्वी शिवारातील गट क्रमांक 139 मध्ये वीज कोसळून नारायण सांडू बांबर्डे यांच्या एका म्हशीचा मृत्यू झाला. तर मांडणा येथील गट क्रमांक 295 मध्ये वीज पडून ज्ञानेश्वर माणिकराव लोखंडे यांची तीन वासरे दगावली. ही जनावरे आर्थिकदृष्ट्या महत्वाची असल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
मृग नक्षत्राने पेरणीला वेग, पण संकट ओढावले
शुक्रवारपासून मृग नक्षत्राने जोरदार हजेरी लावल्याने शेतकरी आनंदात होते. अजिंठा मंडळात 70 मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे पेरणीच्या कामांना वेग आला होता. परंतु शनिवारी दुपारी आलेल्या वादळी वाऱ्यांसह पावसाने या आनंदावर विरजण टाकले. अनेक ठिकाणी शेतजमिनी खरडून गेल्याने पिकांचे नुकसान झाले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.