
Prafulla Patel On Sunetra Pawat Oath: आम्ही विलंब न करता सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा पार पाडला. पुढेपण काही निर्णय घ्यायचे आहेत. यात सर्वांचा मान सन्मान देऊन निर्णय घ्यायचे आहेत.काम करा पुढे चला आणि वचन पाळा, हीच अजित दादांच्या आत्म्याला खरी श्रद्धांजली असल्याचे विधान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले. राष्ट्रवादी काँग्रेस कढून अजित पवारांची श्रद्धांजली सभा आज दिल्लीत पार पडली. दुपारी 1 वाजता श्रद्धांजली कार्यक्रम झाला. या कार्यक्रमानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांशी संवाद साधला.
अजित पवारांसारख्या राज्यातील एका धडाडीच्या नेत्याचा असा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. या धक्क्यातून ना कुटुंबिय सावरलेत ना त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते ना राज्यातील जनता. मात्र असं असताना शपथविधीची आणि उत्तराधिकारी निवडण्याची घाई का करण्यात आली यावरून आता राजकीय वर्तुळातून चर्चा होऊ लागलेत. थोडं थांबायला हवं होतं अशाही प्रतिक्रीया उमटू लागलेत. अजितदादांच्या दशक्रियेनंतर उत्तराधिकारी निवड होणं अपेक्षित होतं असं बोललं जाऊ लागलंय.. दादांची चिता शांत होण्याआधी बैठकांची आणि शपथविधीची घाई का करण्यात आली असा सवाल पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी उपस्थित केलाय. एकीकडे राख सावडली जात होती तर दुसरीकडे नेते बैठका घेत होत एवढी घाई कशासाठी असा सवालही लवांडे यांनी उपस्थि केलाय. पवार कुटुंबांसोबतच संपूर्ण महाराष्ट्र दुखात आहे. मात्र अचानक शपथविधीचा निर्णय झाला.. मात्र शपथविधीची एवढी घाई का केली जातेय. याबाबत मी बोलू शकत नसल्याचं पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी म्हटलय. तर सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत आपल्याला काहीही माहित नाही. प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांना अधिकार आहेत त्यांनी ठरवलं असेल. त्यांचा अधिकार आहे. त्यामुळे एवढ्या घाईत निर्णय का झाला यावर आपण बोलणार नसल्याचं शरद पवारांनी म्हटलंय. यावर प्रफुल्ल पटेल यांनी प्रतिक्रिया दिलीय.
पक्षाला उंचीवर न्यायचंय
आज सकाळी एनडीए बैठकीत उपस्थित होतो. त्यावेळी एनडीए पक्षांकडून अजित पवार यांना श्रद्धांजली दिली. पंतप्रधान मोदी अजित दादांबद्दल बोलले. लोकांसाठी काम करणारा. झटणारा. सकाळपासून रात्री पर्यंत काम करणारा नेते अजित पवार होते, असं मोदीजी म्हणाल्याचे पटेलांनी सांगितले. सुनेत्रा यांना पुढे आपल्याला नेता बनवायचं आहे. आणि पक्षाला उंचीवर न्यायचं आहे. तीच खरी श्रद्धांजली अजित दादांना असेल.
शपथविधी घाईत का?
काही लोकं म्हणतात की सुनेत्रा पवारांचा शपथविधी करण्याचा निर्णय घाईघाईत घेतला. पण राजकीय पक्ष म्हणून आमचा मार्ग थांबवायचा नाही. चालत रहायचं असल्याचे उत्तर प्रफुल्ल पटेल यांनी दिले. सुनेत्रा जी समजदार व्यक्ती आहेत. त्यांचे काम चांगले आहे. अजित पवारांची त्या पत्नी आहेत. अजित पवारांच्या यशात त्यांची महत्त्वाची भूमिका राहीली. त्यांनी सामाजिक संघटना चालवली आहे. विकासाचे काम केले आहे. पर्यावरण एनजीओ चालवल्याचेही ते म्हणाले. सर्वांना मिळून काम करायचे आहे. मीडिया रिपोर्टने डिस्टर्ब होऊ नका. एनसीपी एक मजबूत परिवार आहे. सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वात पक्षाला वाढवायचाय, असेही ते पुढे म्हणाले.
शपथविधीचा निर्णय कोणाच्या सांगण्याने?
सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता माणसापेक्षा खुर्ची महत्त्वाची वाटते असं म्हणत सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी खंत व्यक्त केलीय. माणूसकी हरली खुर्ची जिंकली असं म्हणत दुखवटा संपला नाहीय. थोडं थांबायला हवं होतं असं मत शिरसाट यांनी व्य़क्त केलंय. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही शपथविधी आणि उत्तराधिकारी निवडीच्या या घाईवरून आश्चर्य व्यक्त केलंय. भावना बाजुला ठेवून कर्तव्याला प्राध्यान्य देऊन हा निर्णय घेत असल्याची प्रतिक्रीया यावर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी दिलीय.
कुटुंबात नाराजी?
अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादीची धुरा सुनेत्रा पवारांनी हाती घेतलीय. लोकभवनात सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलीय. पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होण्याचा मान त्यांना मिळाला आहे. मात्र, दुसरीकडे त्यांच्या या निर्णयानं शरद पवार कुटुंबात नाराजीची चर्चा आहे. कारण एकीकडे अजित पवारांचं निधन होऊन अवघे तीन दिवस उलटले आहेत. तेवढ्यात सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तसंच या शपथविधीसंदर्भात खुद्द शरद पवार अनभिज्ञ होते, त्यामुळे सुनेत्रा पवार यांनी शपथविधीचा निर्णय तटकरे, प्रफुल पटेल आणि छगन भुजबळांच्या सांगण्यावरून घेतलाय का? असाही प्रश्न उपस्थित केला जातोय.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



