digital products downloads

सुनेत्रा पवारांचा शपथविधीचा निर्णय कोणाच्या सांगण्याने? इतकी घाई का? राजकीय वर्तुळात काय चर्चा? जाणून घ्या!

सुनेत्रा पवारांचा शपथविधीचा निर्णय कोणाच्या सांगण्याने? इतकी घाई का? राजकीय वर्तुळात काय चर्चा? जाणून घ्या!

Sunetra Pawar DCM Oath: अजित पवार यांचं निधन होऊन तीन दिवस उलटलेत. पवार कुटुंबासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि राज्यातील जनताही यातून अद्याप सावरलेली नाहीय. मात्र निधनानंतर तिस-याच दिवसानंतर राजकीय उत्तराधिकारी निवडीची घाई होत असल्याची टीका राजकीय वर्तुळातून होऊ लागलीये. अजितदादांच्या दशक्रियेनंतर उत्तराधिकारी निवड होणं अपेक्षित होतं असं बोललं जाऊ लागलंय.

Add Zee News as a Preferred Source

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अघातात दुर्दैवी मृत्यू झालाय.अजित पवारांसारखा नेता गेल्यानं संपूर्ण राज्यात शोककळा पसरलीय. मात्र दुसरीकडे  अजित पवारांच्या निधनानंतर तिस-याच दिवसानंतर राजकीय उत्तराधिकारी निवडीची घाई होत असल्याची टीका राजकीय वर्तुळातून होऊ लागलीये. अजितदादांच्या दशक्रियेनंतर उत्तराधिकारी निवड होणं अपेक्षित होतं असं बोललं जाऊ लागलंय.. दादांची चिता शांत होण्याआधी बैठकांची आणि शपथविधीची घाई का करण्यात आली असा सवाल पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी उपस्थित केलाय. एकीकडे राख सावडली जात होती तर दुसरीकडे नेते बैठका घेत होत एवढी घाई कशासाठी असा सवालही लवांडे यांनी उपस्थि केलाय.

पवार कुटुंबांसोबतच संपूर्ण महाराष्ट्र दुखात आहे. मात्र अचानक शपथविधीचा निर्णय झाला.. मात्र शपथविधीची एवढी घाई का केली जातेय. याबाबत मी बोलू शकत नसल्याचं पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी म्हटलय. तर सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत आपल्याला काहीही माहित नाही. प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांना अधिकार आहेत त्यांनी ठरवलं असेल. त्यांचा अधिकार आहे. त्यामुळे एवढ्या घाईत निर्णय का झाला यावर आपण बोलणार नसल्याचं शरद पवारांनी म्हटलंय. 

सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता माणसापेक्षा खुर्ची महत्त्वाची वाटते असं म्हणत सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी खंत व्यक्त केलीय. माणूसकी हरली खुर्ची जिंकली असं म्हणत दुखवटा संपला नाहीय. थोडं थांबायला हवं होतं असं मत शिरसाट यांनी व्य़क्त केलंय. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही शपथविधी आणि उत्तराधिकारी निवडीच्या या घाईवरून आश्चर्य व्यक्त केलंय. भावना बाजुला ठेवून कर्तव्याला प्राध्यान्य देऊन हा निर्णय घेत असल्याची प्रतिक्रीया यावर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी दिलीय.

अजित पवारांसारख्या राज्यातील एका धडाडीच्या नेत्याचा असा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. या धक्क्यातून ना कुटुंबिय सावरलेत ना त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते ना राज्यातील जनता. मात्र असं असताना शपथविधीची आणि उत्तराधिकारी निवडण्याची घाई का करण्यात आली यावरून आता राजकीय वर्तुळातून चर्चा होऊ लागलेत. थोडं थांबायला हवं होतं अशाही प्रतिक्रीया उमटू लागलेत.. 

कुटुंबात नाराजी?

अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादीची धुरा सुनेत्रा पवारांनी हाती घेतलीय. लोकभवनात सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलीय. पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होण्याचा मान त्यांना मिळाला आहे. मात्र, दुसरीकडे त्यांच्या या निर्णयानं शरद पवार कुटुंबात नाराजीची चर्चा आहे. कारण एकीकडे अजित पवारांचं निधन होऊन अवघे तीन दिवस उलटले आहेत. तेवढ्यात सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तसंच या शपथविधीसंदर्भात खुद्द शरद पवार अनभिज्ञ होते, त्यामुळे सुनेत्रा पवार यांनी शपथविधीचा निर्णय तटकरे, प्रफुल पटेल आणि छगन भुजबळांच्या सांगण्यावरून घेतलाय का? असाही प्रश्न उपस्थित केला जातोय.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp