
DCM Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांच्या शपथविधीनंतर पवार कुटुंबात नाराजीची चर्चा आहे. कारण शपथविधीसंदर्भात कोणतीही माहिती नसल्याचं शरद पवारांनी म्हटलंय. त्यामुळे शरद पवारांना न विचारताच सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली का? असा सवाल उपस्थित केला जातोय. तसंच पवार कुटुंबातील सदस्य शपथविधीला गैरहजर असल्यानं या चर्चांना आणखीनच उधाण आलं.
अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादीची धुरा सुनेत्रा पवारांनी हाती घेतलीय. लोकभवनात सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलीय. पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होण्याचा मान त्यांना मिळाला आहे. मात्र, दुसरीकडे त्यांच्या या निर्णयानं शरद पवार कुटुंबात नाराजीची चर्चा आहे. कारण एकीकडे अजित पवारांचं निधन होऊन अवघे तीन दिवस उलटले आहेत. तेवढ्यात सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तसंच या शपथविधीसंदर्भात खुद्द शरद पवार अनभिज्ञ होते, त्यामुळे सुनेत्रा पवार यांनी शपथविधीचा निर्णय तटकरे, प्रफुल पटेल आणि छगन भुजबळांच्या सांगण्यावरून घेतलाय का? असाही प्रश्न उपस्थित केला जातोय.
शपथविधीसंदर्भात रोहित पवार आणि युगेंद्र पवारांनी देखील थेट बोलणं टाळलं, शपथविधीला पवार कुटुंबातील कोणीही जाणार नसल्याचं त्यांनी आधीच स्पष्ट करून टाकलं होतं. तर दुसरीकडे शरद पवार आणि सुप्रिया सुळेंनी सुनेत्रा शपथविधीला यावं असा आग्रह पार्थ पवारांचा होता, मात्र, त्यांच्या मनधरणीला देखील अपयश आल्याचं पाहायला मिळालं, तर दुसरीकडे सुनेत्रा पवारांच्या शपथविधीची तयारी सुरू असताना सुप्रिया सुळेंनी काटेवाडीत जाऊन अजित पवारांच्या आईची भेट घेतली होती.
सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री, पवार कुटुंबात नाराजी?
शुक्रवारीच सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचं स्पष्ट झालं होतं. सकाळी देखील पार्थ पवारांनी शरद पवारांसोबत चर्चा केल्याची माहिती आहे. शपथविधीच्या पार्श्वभूमीवर गोविंद बागेत सकाळपासूनच हालचाली सुरू झाल्या होत्या. मात्र, दादांचं कुटुंब सोडलं तर पवार कुटुंबातील दुसरं कोणीही शपथविधीला हजर नव्हते.
सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलीय. त्यांच्या हातातच राष्ट्रवादीची सर्व सूत्र जाणार हे जवळजवळ आता निश्चित झालंय. उपमुख्यमंत्रिपदासोबत राष्ट्रवादी अध्यक्षपदाची धुरा देखील त्यांच्याच हातात जाणार असल्याची शक्यता आहे. मात्र, राष्ट्रवादीत सुरू असलेल्या या सर्व घडामोडींमुळे शरद पवार नाराज असल्याच्या चर्चा आहेत.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



