digital products downloads

सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षपदासाठी केवळ 35 आमदारांच्या सह्या का? रोहित पवारांनी उपस्थित केला प्रश्न

सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षपदासाठी केवळ 35 आमदारांच्या सह्या का? रोहित पवारांनी उपस्थित केला प्रश्न

Controversy Over Sunetra Pawar’s Presidency: सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदासंदर्भात रोहित पवारांनी मोठं विधान केलंय. सुनेत्रा पवार अध्यक्ष झाल्या पाहिजेत यासाठी केवळ 35 आमदारांनीच सह्या केल्याचा दावा रोहित पवारांनी केलाय. तर इतर आमदारांचा सुनेत्रा पवारांना विरोध का? असाही सवाल त्यांनी केलाय. त्यामुळे रोहित पवारांचा रोख नेमका कोणाकडे आहे? असा सवाल उपस्थित केला जातोय. 

Add Zee News as a Preferred Source

 

केवळ 35 आमदारांनीच सह्या केल्यात – रोहित पवार 

अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचा अध्यक्ष कोण यावरून चांगलंच राजकारण रंगलं होतं, अध्यक्षपदाची अधिकृत घोषणा झाली नसली तरी सुनेत्रा पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलाय, दरम्यान याच अध्यक्षपदाच्या निवडीवरून रोहित पवारांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. सुनेत्रा पवार राष्ट्रवादीच्या अध्यक्षा व्हाव्यात यासाठी केवळ 35 आमदारांनीच सह्या केल्या आहेत असा दावा रोहित पवारांनी केलाय, इतर आमदारांनी का सह्या केल्या नाहीत असाही सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. 

 

सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदाला विरोध करणारे ते आमदार कोण?

रोहित पवारांनी केलेल्या दाव्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना तोंड फुटलंय, तसंच सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदाला विरोध करणारे ते आमदार कोण? असा प्रश्नही राजकीय  वर्तुळात उपस्थित केला जातोय, तर सुनेत्रा पवारांना सर्वच आमदारांचा पाठिंबा आहे, त्यामुळे सह्यांचा प्रश्नच उद्भवत नसल्याचं म्हणत आनंद परांजपेंनी रोहित पवारांवर पलटवार केलाय. 

 

सुनेत्रा पवारच राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष होणार

मुंबईत 16 तारखेला राष्ट्रवादीच्या बैठकीत सुनेत्रा पवारांच्या नावावर एकमत झालंय. त्यामुळे सुनेत्रा पवारच राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष होणार आहेत. 26 तारखेला राष्ट्रवादीच्या कार्यकारिणी बैठकीमध्ये सुनेत्रा पवारांच्या नावाची घोषणा करण्यात येणार आहे. 

 

रोहित पवारांचा रोख नेमका कुणाकडे? 

राष्ट्रवादी अध्यक्षपदाची धुरा सुनेत्रा पवारच सांभाळणार आहेत. लवकरच सुनेत्रा पवारांच्या नावाची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. मात्र, रोहित पवारांच्या दाव्यानंतर आता चर्चा सुरू झाल्या आहेत. सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदाला विरोध करणारे ते आमदार कोण? सुनेत्रा पवारांना विरोध करण्यामागे कारण काय? असे असंख्य सवाल यानिमित्तानं उपस्थित केले जात आहेत. तसंच रोहित पवारांचा रोख नेमका कुणाकडे आहे, अशीही चर्चा आता सुरू झालीय. 

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp