
Fourth Mumbai In Maharashtra : महाराष्ट्र हे प्रचंड वेगाने विकसीत होत आहे. महाराष्ट्रात नवीन शहर देखील विकसीत केली जात आहेत. मुंबई आणि नवी मुंबई या शहरावर येणार ताण कमी करण्यासाठी महाराष्ट्रात तिसरी मुंबई (Third Mumbai) उभारली जात आहे. तर, दुसरीकडे चौथ्या मुंबईचे देखील प्लानिंग सुरु आहे. चौथी मुंबई हे सुपर कनेक्टिव्हीटी असणारे महाराष्ट्रातील एकमेव शहर ठरणार आहे. देशातील 8 मोठे प्रोजेक्ट डायरेक्ट चौथ्या मुंबईला कनेक्ट होणार आहेत.
महाराष्ट्रात चौथी मुंबई निर्माण करण्याचा प्लान तयार केला जात आहे. चौथी मुंबई हे मुंबई, नवी मुंबई आणि तिसऱ्या मुंबईपेक्षा सुपर कनेक्टिव्हीटी असणारे शहर ठरणार आहे. पालघर जिल्ह्यात प्रस्तावित वाढवण बंदर प्रकल्प उभारला जात आहे. या परिसरात चौथी मुंबई उभारण्याची योजना आहे. महाराष्ट्रातील वाढवण बंदर हा मोदी सरकारचा ड्कीम प्रोजेक्ट आहे. समुद्रकिनाऱ्यावर 20 मीटरपेक्षा जास्त खोली असलेलं हे देशातील एकमेव नैसर्गिक बंदर आहे. त्यामुळे अजस्त्र कंटेनर येथे सहज येवू शकतात. जवळपास 298 मिलियन टन क्षमतेचं हे देशातील 13 व्या क्रमांकाचं बंदर असेल.या बंदरातून कोळसा, सिमेंट, केमिकल आणि तेल यांची वाहतूक करता येईल. वाढवण बंदर पूर्णपणे विकसित झालेल्यानंतर जगातील टॉप 10 कंटेनर पोर्ट देशांच्या यादीत भारताचा समावेश होणार. वाढवण बंदर हा प्रकल्प जवळपास 76 हजार कोटी रुपयांचा आहे.
वाढवण बंदर संपूर्ण देशासाठी गेमचेंजर ठरणार आहे. या वाढवण बंदराचे काम पूर्ण होई पर्यंत पालघरमध्ये मुंबईजवळील तिसरे विमानतळ तसेत रस्ते उभारले जाणार आहेत. वाढवण बंदराजवळच चौथी मुंबई उभारण्याचा प्लान आहे. वसई, विरारपासून पुढे पालघरकडे चौथी मुंबई निर्माण केली जाणार आहे. मुंबईतील कोस्टल रोड पालघरच्या वाढवण बंदरापर्यंत नेला जाणार आहे. देशातील 8 मोठे प्रोजेक्ट चौथ्या मुंबईला डायरेक्ट कनेक्ट होणार आहेत. दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्ग, बोईसर बुलेट ट्रेन स्टेशन, विरार बुलेट ट्रेन स्टेशन, वाढवण खोल सागरी बंदर, वाढवण विमानतळ, वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर, उत्तन-विरार-पालघर सी लिंक, इगतपुरी-वाळवण द्रुतगती मार्ग आणि विरार-अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडॉर हे चौथ्या मुंबईला जोडले जाणार आहेत. देशातील 8 मोठे प्रोजेक्ट डायरेक्ट कनेक्ट होणार आहेत.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.