
भाजप आमदार सुरेश धस यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरण लावून धरत धनंजय मुंडे यांच्यावर ‘आकाचे आका’ म्हणत टीकेची झोड उठवली होती. पण आता त्यांनीच धनंजय मुंडे यांची भेट घेतल्याने त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. एकीकडे सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटी
.
पुणे महापालिकेच्या वर्धापनदिन निमित्त पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पालिका इमारतीला भेट दिली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. पत्रकारांनी त्यांना सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीबाबत विचारले असता, त्यांनी पत्रकारांचीच शाळा घेतली. कोण कुणाला भेटले तर तुला काय वाईट वाटतंय? तुला वाईट वाटायचे काय कारण? असा सवाल करत अजित पवारांनी पत्रकाराला ऐकवले.
नेमके काय म्हणाले अजित पवार? धनंजय मुंडे मंत्री आहेत. सुरेश धस आमदार आहेत. मुंडे आजारी असल्याने धस यांनी त्यांची भेट घेतली. शेवटी हे राज्य यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांनी चालते. आपल्याला त्यांनी सुसंस्कृतपणाची शिकवण दिली आहे. त्यामुळे कोण कोणाला भेटले यात दुष्मनी पाहायची नसते. तुमचाच एखादा पत्रकार मित्र आजारी असेल, ज्याच्याशी तुमचे पटत नसेल, अशा मित्राची विचारपूस तुम्ही करणार नाही का? असे म्हणत अजित पवार यांनी पत्रकारांनाच ऐकवले.
आमची महायुती होण्यापूर्वी देखील चंद्रकांत पाटील आणि आम्ही भेटायचो बोलायचे. आमची काही दुश्मनी नाही. त्यावेळी आमची विचारधारा वेगळी होती. आता आमची विचारधारा एक झाली आहे. त्या पद्धतीने आम्ही पुढे चालेलो आहोत. सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांचे पूर्वीपासूनचे संबंध आहेत. जर तुम्ही आजारी पडला तर सहकारी पत्रकार म्हणून माणुसकीच्या नात्याने तुम्हाला पण भेटायला येतात ना? त्यामुळे या भेटीकडे काहीतरी वेगळे झालंय असे पाहू नका, असा सल्लाही अजित पवार यांनी माध्यमांना दिला.
देशमुख कुटुंबीयांच्या मागण्या योग्यच अजित पवार यांनी यावेळी बोलताना संतोष देशमुख यांच्या कुटुंबावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. संतोष देशमुख यांची हत्या अत्यंत क्रूरपणे झालेली आहे. कोणालाही त्याचे वाईट वाटणारच. त्यांची पत्नी असेल दोन लहान मुले असतील, बंधू असतील त्यांचे कुटुंब असेल. त्या सगळ्यांच्या मनामध्ये ही भावना येणे साहाजिकच आहे. त्यामुळे त्यांच्या मागण्या योग्यच आहेत. आभाळ कोसळल्यानंतर प्रत्येकाची संतप्त भावना असते.
फरार आरोपीला पकडण्याचे प्रयत्न सुरू आमचा प्रयत्न आहे, की न्यायालयीन चौकशी, सीआयडी, एसआयटी यांच्याकडून या प्रकरणातील रिपोर्ट लवकरात लवकर यावेत, मुख्यमंत्री सांगत आहेत, मी पण सांगतोय, या प्रकरणात कोणीही दोषी असेल, त्यांची कोणाचीच गय केली जाणार नाही. ज्याच्या पर्यंत धागेदोरे पोहोचतील त्यांना कडक शासन केले जाईल. तपासाला वेळ लागतो. आज 60 दिवस झाले पण त्यातील एक व्यक्ती अजूनही सापडत नाही, असे होत नाही पण दुर्दैवाने तो सापडत नाही, त्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहे, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.