digital products downloads

सुषमा अंधारेंचा चाकणकरांवर हल्ला: तटकरे अन् चाकणकरांच्या बोटाला दरवाज्यात अडकल्याने जखम झाली हा कमालीचा योगायोग – Maharashtra News

सुषमा अंधारेंचा चाकणकरांवर हल्ला:  तटकरे अन् चाकणकरांच्या बोटाला दरवाज्यात अडकल्याने जखम झाली हा कमालीचा योगायोग – Maharashtra News

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आज पुन्हा एकदा राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर हल्ला चढवला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या

.

सुषमा अंधारे यांनी काही दिवसांपूर्वी रुपाली चाकणकरांवर भोंदू अशोक खरातच्या सल्लानुसार अनामिका कापल्याचा खळबळजनक आरोप केला होता. यासंबंधी त्यांनी त्यांचे काही फोटोही शेअर केले होते. त्यात चाकणकरांच्या अनामिकेला जखम झाल्याचे दिसून येत होते. चाकणकरांनी आज एका व्हिडिओद्वारे त्यांचे आरोप जोरकसपणे फेटाळून लावले. या व्हिडिओत धायरीच्या गणेश मंडळाचा एक पदाधिकारी रुपाली चाकणकरांच्या अनामिकेला आरतीला येताना दरवाज्यात अडकल्यामुळे जखम झाल्याचा दावा करताना दिसून येत आहे.

तटकरे अन् चाकणकरांच्या जखमांचा योगायोग

सुषमा अंधारे यांनी त्यांच्या या दाव्यावर हरकत घेतली. त्या यासंबंधी म्हणाल्या, रुपाली चाकणकरांना अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर तब्बल 4 दिवसांनंतर नेमके त्यांच्या अनामिकेला नेमके काय झाले होते याचे कारण सूचले आहे. त्यांचे व्हॉट्सएप स्टेटस, बातम्या यावरून जाणवते की, म्हणे त्यांच्या अनामिकेला दरवाजात अडकल्यामुळे जखम झाली. साधारणतः मला कळते त्यानुसार दरवाजात माणसाचा अडकू शकतो. तर्जनी अडकू शकते किंवा करंगळी अडकते. पण काय योगायोग चाकणकरांच्या अनामिकेला दरवाज्यामुळे जखम झाली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी काही वेळापूर्वीच एक पत्रकार परिषद घेतली. त्यांनीही सांगितले की, त्यांच्याही तर्जनीला सुद्धा दरवाज्यात अडकल्यामुळेच जखम झाली. एकूण काय तर हातातले गंडेदोरे काय, ईशान्येश्वराची पुजा काय, बोटाला होणारी पुजा काय आणि नेमकी ती जखम दरवाज्यात अडकून होते हा सगळाच किती योगायोग आहे. कमाल आहे, असे त्या म्हणाल्या.

खरे खोटे ईशान्येश्वर अन् खरातलाच माहिती

रुपाली चाकणकरांचा कार्यकर्ता सांगत आहे की ताईंच्या बोटाला दरवाज्यात अडकल्यामुळे जखम झाली. ताई आमच्याकडे त्यादिवशी आरतीला आल्या होत्या, पण काय गंमत आहे की चाकणकर स्वतः सांगतात दोन तारखेला त्या अजितदादांच्या दौऱ्यामध्ये होत्या. काय खरं काय खोटं ईशान्येश्वराला आणि खरातांनाच माहिती. पण हा किती मोठा योगायोग आहे की तटकरेंच्या बोटाला झालेली जखम सुद्धा दरवाजात अडकूनच झाली, असेही सुषमा अंधारे आपल्या पोस्टमध्ये म्हणाल्या.

हे ही वाचा…

चाकणकरांच्या अनामिकेला दुखापत कशी झाली?:धायरीच्या गणेश मंडळाच्या अध्यक्षाचा VIDEO शेअर करत फेटाळले अंधारेंचे आरोप

राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी भोंदू अशोक खरातच्या नादाला लागून तंत्रमंत्र विद्येसाठी आपली अनामिक कापल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला होता. त्यांच्या आरोपामुळे राज्यात एकच खळबळ माजली होती. आता रुपाली चाकणकर यांनी स्वतः धायरीच्या एका गणेश मंडळाच्या अध्यक्षांचा व्हिडिओ शेअर करत आपल्या अनामिकेला दुखापत कशी झाली? हे स्पष्ट केले आहे. त्यांच्या मते, गाडीतून उतरताना बोट दरवाज्यात अडकल्यामुळे आपल्या बोटाला दुखापत झाली होती, असे त्यांनी म्हटले आहे. वाचा सविस्तर

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp