
Ganeshotsav News Lalbaugcha Raja 2025 Donation On First Day: मुंबईतील गणेशोत्सवाच्या मुख्य आकर्षणांपैकी एक असलेल्या ‘लालबागचा राजा’ गणेशोत्सव मंडळाच्या गणरायांची बुधवार, 27 ऑगस्ट 2025 रोजी पहाटे 5:00 वाजता मंडळाचे अध्यक्ष श्री. बाळासाहेब सुदाम कांबळे यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापणा झाली. त्यानंतर दर्शनाची रांग सुरू करण्यात आली. पहाटेपासूनच लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी दिसून आली. ‘लालबागच्या राजा’ला भाविकांनी पहिल्या दिवशीच भाविकांनी भरभरुन दान दिल्याचं पाहायला मिळत आहे. भाविकांनी दान केलेल्या वस्तूंमध्ये सोन्या-चांदीच्या वस्तूंचा समावेश असून त्याची मोजदाद आता सुरू करण्यात आली आहे.
कोण मोजतं लालबागचा राजाला आलेलं दान?
गणेशोत्सवात भाविकांची सर्वाधिक गर्दी लालबागच्या राजाच्या दर्शनाला होत असते. भाविक ‘लालबागाचा राजा’ला मोठ्या प्रमाणात दान देतात. गणेशोत्सवाची सुरवात झाल्यावर दुसऱ्या दिवासापासून या दान केलेल्या वस्तू आणि नीधींची मोजदाद सुरू करण्यात येते. ही मोजदाद बँक ॲाफ महाराष्ट्र आणि जी एस महानगर बँकेचे कर्मचारी करतात. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ या नीधीचा उपयोग गरजू सर्वासामान्य नागरिकांच्या कल्याणकारी उपक्रमासाठी करते. लालबागाचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे खजिनदार मंगेश दळवी आणि त्यांचे कार्यकारिणी सदस्यांच्या उपस्थितीत सध्या ही मोजदाद सुरू करण्यात आली आहे.
सोन्या-चांदीच्या वस्तू
लालबाग राजाच्या दर्शनाला लाखो भाविकांनी पहिल्याच दिवशी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे. राज्याबरोबरच देशभरातून येणारे भक्त राजाच्या दानपेटी सोन्याचांदीच्या वस्तू दान करत असतात यंदा पहिल्या दिवशी दोन लाखांचा सोन्याचा मोदक एका भक्ताने दान केला आहे.
अमेरिकी डॉलर्सची संख्या अधिक
भाविकांनी भारतीय चलनाबरोबरच मोठ्या प्रमाणात परदेशी नोटाही दानपेटीत टाकल्यात. यामध्ये अमेरिकी डॉलर्सची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.
VIDEO | Mumbai: Counting of first day donation for Lalbaugcha Raja begins. This year, the donation hundi has received an impressive variety of foreign currencies, reflecting the global devotion to the Ganpati.
In addition to cash, the trust has also received unique… pic.twitter.com/2ByCzKugfW
— Press Trust of India (@PTI_News) August 28, 2025
पहिल्या दिवशी दान म्हणून मिळालेल्या चांदीच्या वस्तू कोणत्या आहेत?
एक किलो वजनाची चांदीची वीट एका भक्ताने दान केली आहे.
चांदीचे मोदक, चांदीचे गणपती, चांदीचे मुकुट, चांदीचे हारही भक्तांनी दान केलेत.
चांदीचे पाळणे, चांदीच्या समया, चांदीची फुल घरं भाविकांनी दान केली आहेत.
लालाबागचा राजला पहिल्याच दिवशी आलेल्या सोन्याच्या वस्तू कोणत्या?
सोन्याची पावपलं, सोन्याचे हार, सोन्याची मुकुटं भाविकांनी दान केली आहे.
याचबरोबर सोन्याच्या अंगठ्या, सोन्याची नाणी, सोन्याच्या गणपती मूर्तीही भाविकांनी दान केल्या.
एका भाविकाने तर दोन लाखाचा सोन्याचा मोदक राजाला दान केलाय.
FAQ
लालबागचा राजा गणेशोत्सव 2025 कधी सुरू झाला?
लालबागचा राजा गणेशोत्सव 2025 ची सुरुवात बुधवार, 27 ऑगस्ट 2025 रोजी पहाटे 5:00 वाजता मंडळाचे अध्यक्ष श्री. बाळासाहेब सुदाम कांबळे यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापनेने झाली. त्यानंतर दर्शनाची रांग सुरू करण्यात आली.
लालबागचा राजाला भाविकांनी कोणत्या प्रकारचे दान दिले?
भाविकांनी लालबागचा राजाला सोने-चांदीच्या वस्तूंसह मोठ्या प्रमाणात दान दिले आहे. यामध्ये सोन्याचा मोदक (2 लाख रुपये किमतीचा), सोन्याची पावपलं, सोन्याचे हार, सोन्याची मुकुटं, सोन्याच्या अंगठ्या, सोन्याची नाणी, सोन्याच्या गणपती मूर्ती, एक किलो चांदीची वीट, चांदीचे मोदक, चांदीचे गणपती, चांदीचे मुकुट, चांदीचे हार, चांदीचे पाळणे, चांदीच्या समया आणि चांदीची फुल घरं यांचा समावेश आहे.
लालबागचा राजाला मिळालेले दान कोण मोजते?
लालबागचा राजाला मिळालेले दान आणि वस्तूंची मोजदाद बँक ऑफ महाराष्ट्र आणि जीएस महानगर बँकेचे कर्मचारी करतात. ही प्रक्रिया लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे खजिनदार मंगेश दळवी आणि कार्यकारिणी सदस्यांच्या उपस्थितीत होते.
दानाची मोजदाद केव्हा सुरू होते?
गणेशोत्सवाच्या दुसऱ्या दिवसापासून (म्हणजेच 28 ऑगस्ट 2025 पासून) लालबागचा राजाला मिळालेल्या दानाच्या वस्तू आणि निधीची मोजदाद सुरू होते.
लालबागचा राजाला मिळालेल्या दानाचा उपयोग कशासाठी केला जातो?
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मिळालेल्या दानाचा उपयोग गरजू आणि सर्वसामान्य नागरिकांच्या कल्याणकारी उपक्रमांसाठी करते. यामध्ये सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्याशी संबंधित प्रकल्पांचा समावेश असतो.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.