digital products downloads

‘सो कॉल्ड Infra Man’ मुख्यमंत्री फडणवीस मुलुंडच्या दुर्घटनेची जबाबदारी घेणार का? की प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करतील?’

‘सो कॉल्ड Infra Man’ मुख्यमंत्री फडणवीस मुलुंडच्या दुर्घटनेची जबाबदारी घेणार का? की प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करतील?’

Congress Harshwardhan Sapkal on Metro Slab Collapse: मुंबईतील मुलुंड येथे मेट्रोचं काम सुरु असताना स्लॅब कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला असून, तिघे जखमी झाले आहेत. या घटनेनंतर नागरिकांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं असून, या दुर्घटनेची जबाबदारी घेणार का? अशी विचारणा केली आहे. मुंबईकर एकतर खड्ड्यात नाहीतर मेट्रो बांधकामादरम्यान होणाऱ्या जिवघेण्या अपघातात भरडला जात आहे! असा संतापही त्यांनी व्यक्त केला आहे. 

Add Zee News as a Preferred Source

“मुलुंड मधील LBS रोड वर बांधकाम सुरू असलेल्या मेट्रोचा स्लॅब कोसळल्याचे वृत्त आहे. प्राथमिक माहितीनुसार एकाचा मृत्यू झाला असून 3-4  जण जखमी आहेत. ‘सो कॉल्ड Infra Man’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निर्माणाधीन बांधकाम कोसळल्याची जबाबदारी घेतील का? की यातील भ्रष्टाचारात त्यांचीही भागीदारी असल्याने मलमपट्टी करण्यासाठी पुन्हा काहीतरी दुसरे मुद्दे काढून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करतील?,” असं हर्षवर्धन सपकाळ म्हणाले आहेत.  

एमएमआरडीए जबाबदारी घेणार का? हे कोणते कंत्राटदार आहे? त्यांच्यावर कारवाई होणार का? मेट्रोची काम लोकवस्तीच्या ठिकाणी होत असताना सुरक्षेची काळजी का घेतली जात नाही? यात सामन्यांचा जीव जातोय…मेट्रोची काम किती वेगाने सुरू आहे दाखवण्याचा नादात त्याचा दर्जा आणि सुरक्षा प्रशासन बघणार आहे की नाही?  मुंबईकर एकतर खड्ड्यात नाहीतर मेट्रो बांधकामादरम्यान होणाऱ्या जिवघेण्या अपघातात भरडला जात आहे! असंही ते म्हणाले आहेत. 

मृताच्या वारसांना 5 लाखांची मदत जाहीर

मुंबईतील मुलुंड भागात मेट्रो बांधकामाचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून इतर काही जखमी झाले आहेत. या घटनेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केले असून या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. मृताच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत राज्य सरकार देईल आणि जखमींच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार करेल. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे. 

महापौरांनी काय म्हटलं?

“100 टक्के निष्काळजीपणा झाला आहे. मी पाहिल्या फोटो आणि व्हिडीओतून हा निष्काळजीपणा दिसत आहे. कालच हा पॅराफिट वॉल बसवला होता असं मला समजलं आहे. कालच बसवल्यानंतर आज पडला असेल तर खूप मोठा निष्काळजीपण आहे. क्य़ुरिंग, बॅरिकेड्स सगळाच निष्काळजपणा दिसत आहे,” असं महापौर रितू तावडे यांनी सांगितलं आहे.

“मी अधिक माहिती आमदारांकडून घेते आणि कळवते. 100 टक्के कारवाईची मागणी करणार. मी गाडीत असताना प्रशासनाकडून माहिती घेत होते. क्युरिंग करत होते का? इंजिनिअर्सनी लक्ष ठेवलं होतं का? एसओपीचं पालन केलं जात होतं की नाही? हे का झाल? याची कारणं शोधावी लागतील. बॅरिकेड्स का लावण्यात आले नव्हते? खालून जाणाऱ्या गाड्यांना थांबवण्याची गरज होती,” असंही त्यांनी म्हटलं आहे. 

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp