
Mumbai News : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये (Raj Thackeray And Uddhav Thackeray) मातोश्रीवर तब्बल अडीच तास चर्चा झालीय. आगामी पालिका निवडणुका आणि युतीवरही दोन्ही बंधूंमध्ये चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. राज ठाकरे सहकुटुंब आज मातोश्रीवर स्नेहभोजनासाठी दाखल झाले होते. गेल्या अडीच महिन्यात ठाकरे बंधूंमध्ये सहाव्यांदा भेट झालीय.
युतीची घोषणा झाली नसली तरी ठाकरे बंधू एकत्रित निवडणुकीच्या मैदानात उतरणार हे जवळजवळ निश्चित झालंय. कारण राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंची पुन्हा एकदा भेट घेतलीय. जवळपास दोन दशकानंतर संपूर्ण कुटुंबासह राज ठाकरे मातोश्रीवर स्नेहभोजनासाठी गेल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान यावेळी ठाकरे बंधूंमध्ये युतीवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. त्यामुळे येत्या काही दिवसात ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होण्याची चिन्ह आहेत.
5 जुलै : महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी सक्तीचा निर्णय घेतल्यानंतर ठाकरे बंधू एकत्र आक्रमक झाले, हिंदीविरोधात वरळी डोम येथे एकत्र आले.
27 जुलै : उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे थेट मातोश्रीवर पोहोचलेत उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देत चर्चा केली.
27 ऑगस्ट : गणेशोत्सवात राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना गपणपतीच्या दर्शनाचं निमंत्रण दिलं.
10 सप्टेंबर : गणेशोत्सवानंतर उद्धव ठाकरे पुन्हा शिवतीर्थवर गेलेत, तेव्हा दोन्ही बंधूंमध्ये 5 ते 10 मिनिंट राजकीय चर्चा
5 ऑक्टोबर : संजय राऊतांच्या नातवाच्या बारशाच्या कार्यक्रमाला राज, उद्धव ठाकरे सहकुटुंब उपस्थित, कार्यक्रमानंतर राज ठाकरे मातोश्रीवर गेले.
12 ऑक्टोबर : राज ठाकरे संपूर्ण कुटुंबासह स्नेहभोजनासाठी मातोश्रीवर, या भेटीत दोन्ही बंधूंमध्ये राजकीय चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती.
दरम्यान मातोश्रीमध्ये जात असताना राज ठाकरेंनी एक मिश्किल टोलाही लगावला. आईसोबत आहे त्यामुळे समजून घ्याकशासाठी जातोय असंही यावेळी राज ठाकरे म्हणालेत. तसंच राज ठाकरे, उद्धव ठाकरे दोन राजकीय पक्षाचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे भेटीत राजकीय चर्चा देखील झाली असावी असं मोठंविधान बाळा नांदगावकरांनी केलंय.
ठाकरेंच्या युतीसंदर्भात देखील बाळा नांदगावकरांनी रोखठोक भाष्य केलंय. ठाकरे बंधूंमध्ये युतीची बोलणी सुरू असेल. मात्र, युतीची घोषणा ही ठाकरे बंधूच करतील असंही यावेळी बाळा नांदगावकरांनी म्हटलंय. तर ठाकरे बंधूंच्या भेटीकडे राजकीयदृष्ट्या बघत नसल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलंय. उद्धव ठाकरेंनी संभाजीनगरमध्ये झालेल्या हंबरडा मोर्चांमधूनही युतीचे स्पष्ट संकेत दिले होते. महाराष्ट्राच्या प्रत्येक संकटाविरूद्ध आम्ही दोघेही एकत्र येऊ असं विधान उद्धव ठाकरेंनी केलेलं होतं. त्यामुळे एकीकडे उद्धव ठाकरे युतीबाबत कमालीचे सकारात्मक दिसतायत. तर दुसरीकडे राज ठाकरेंनी अद्यापही स्पष्ट भूमिका मांडलेली नाहीये.
मागील काही दिवसांपासून ठाकरे बंधूंच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. कधी उद्धव ठाकरे शिवतीर्थवर तर कधी राज ठाकरे मातोश्रीवर जातायत. तसंच या भेटींमध्ये ठाकरे बंधूंमध्ये युतीवर चर्चा झाल्याची देखील माहिती आहे. दरम्यान आज राज ठाकरे सहकुटुंब स्नेहभोजनासाठी मातोश्रीवर गेलेत. मात्र, यावेळी देखील दोन्ही बंधूंमध्ये राजकीय चर्चेची माहिती आहे. काही दिवसात पालिका निवडणुकींचं बिगुल वाजणारय. त्यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा देखील लवकर होणार असल्याची चर्चा आता सुरू झालीय.
FAQ :
राज ठाकरेंनी भेटीत काय मजेदार टोला लगावला?
उत्तर: मातोश्रीकडे जाताना राज ठाकरेंनी आईसोबत असल्याने “समजून घ्या, कशासाठी जातोय” असा मिश्कील टोला लगावला. यामुळे भेटीला कुटुंबीय हास्याचा रंग चढला.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे नुकत्याच्या भेटीत काय घडलं?
उत्तर: राज ठाकरे यांनी संपूर्ण कुटुंबासह १२ ऑक्टोबरला मातोश्रीवर स्नेहभोजनासाठी भेट दिली. या भेटीत अडीच तास चर्चा झाली, ज्यात आगामी पालिका निवडणुका आणि युतीवर बोलणी झाल्याची सूत्रांची माहिती आहे. ही गेल्या अडीच महिन्यातील सहावी भेट आहे.
ठाकरे बंधूंची युती निश्चित झालीय का?
उत्तर: युतीची अधिकृत घोषणा झालेली नाही, पण ठाकरे बंधू एकत्रित निवडणुकीत उतरणार हे जवळजवळ निश्चित झालंय. सूत्रांनुसार, भेटींमध्ये युतीवर चर्चा होतेय. उद्धव ठाकरे संभाजीनगरच्या हंबरडा मोर्चात “महाराष्ट्राच्या प्रत्येक संकटाविरुद्ध आम्ही दोघे एकत्र येऊ” असं म्हणाले, ज्यामुळे सकारात्मक संकेत मिळाले. राज ठाकरेंनी अद्याप स्पष्ट भूमिका मांडलेली नाही.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.