digital products downloads

स्वतःचे दुकान उघडल्याने तरुणाचा खून: पुण्यात बिबवेवाडी येथे तिघांना अटक – Pune News

स्वतःचे दुकान उघडल्याने तरुणाचा खून:  पुण्यात बिबवेवाडी येथे तिघांना अटक – Pune News



कटींग दुकानात काम केल्‍यानंतर गावाला जातो सांगत स्वतःचे सलूनचे दुकान सुरू करणाऱ्या तरूणाचा तिघांनी मिळून खून केल्‍याचा धक्‍कादायक प्रकार बिबबवेवाडी येथे घडला. याप्रकरणी खून करणाऱ्या तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्‍या आहेत. मोहमद्द शमी (25, अप्पर जुना बसस्‍टॉप, बिबवेवाडी मुळ रा. प्रयागराज, उत्‍तरप्रदेश) असे खुन झालेल्‍या तरूणाचे नाव आहे. याबाबत मोहम्‍मद सलमान फिरोज कुरेशी (18, रा. साई स्मार्ट, तिरूपती भेळ शेजारी, जुना बसस्‍टॉप, बिबवेवाडी, पुणे) याने बिबवेववाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. याप्रकरणी खुन करणाऱ्या आरोपी सौरभ चोरगे, अनिकेत सराटे, रोहित बालशंकर अशा तिघांना अटक करण्यात आली आहे. हा प्रकार गुरूवारी सायंकाळी घडला. फिर्यादी मोहम्‍मद कुरेशी हा मोहम्‍मद शमी याचा भाऊ आहे. दोघेही मुळचे प्रयागराज येथील राहणारे आहेत. यातील आरोपी सौरभ चोरगे याच्‍या कटींगच्या सलूनमध्ये मोहम्‍मद शमी हा गेल्‍या दोन वर्षापासून कामाला होता. काही दिवसांपूर्वी शमीने मालकाला गावाला जातो सांगितले. परंतु गावाला न जाता त्‍याने स्वतःचे कटींग सलूनचे दुकान सुरू केले. मात्र शमी हा चोरगेकडील ग्राहक स्वतःच्‍या दुकानात बोलवू लागला. याची खबर चोरगेला लागली. याचाच राग मनात धरून तो मित्रांसह शमी याला जाब विचारण्यासाठी त्‍याच्‍याकडे गेला. तेथे त्‍याच्‍यात वाद झाले. यात तिघांनी शमीला लाथा बुक्‍क्‍यांनी जोरदार मारहाण केली. यातच शमीचा मृत्‍यू झाला. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्‍हा दाखल करण्यात आला असून तिघांनाही याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp