digital products downloads

स्वारगेट प्रकरणातील आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न: ​​​​​​​वैद्यकीय तपासणीत गळ्यावर आढळले दोरीचे व्रण, पुणे पोलिस आयुक्तांनी केली पुष्टी – Pune News

स्वारगेट प्रकरणातील आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न:  ​​​​​​​वैद्यकीय तपासणीत गळ्यावर आढळले दोरीचे व्रण, पुणे पोलिस आयुक्तांनी केली पुष्टी – Pune News


पुण्याच्या स्वारगेट बसस्थानकावर उभ्या शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची बाब समोर आली आहे. आरोपीच्या प्राथमिक वैद्यकीय तपासणीत त्याच्या गळ्यावर दोरीचे व्रण (वळ) आढळून आलेत. पुण्याचे पोलिस आयुक्त

.

पुण्यातील स्वारगेट बसस्थानकावर शिवशाही बसमध्ये झालेल्या अत्याचार प्रकरणामुळे अवघ्या महाराष्ट्रात खळबळ माजली आहे. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला गुरुवारी मध्यरात्री शिरुर तालुक्यातील गुनाट गावातून अटक केली आहे. त्याला लवकरच कोर्टात हजर करण्यात येणार आहे. तत्पूर्वी, करण्यात आलेल्या वैद्यकीय तपासणीत त्याने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट झाले आहे.

गळ्यावर गळफास घेतल्याच्या दोरीच्या खुणा

पत्रकारांनी याविषयी येथे आयोजित पत्रकार परिषदेत पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना प्रश्न केला. त्यावर ते म्हणाले, प्राथमिक वैद्यकीय चाचणीनुसार आरोपीच्या गळ्यावर दोरीचे व्रण आहेत. या व्रणानुसार आरोपीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. आरोपीने तशी कबुली दिली. मी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. दोरी तुटल्यामुळे व वेळीच इतर लोक धावून मदतीस आल्यामुळे आपला जीव वाचला असे त्याने सांगितले आहे. आता आरोपीने खरेच आत्महत्येचा प्रयत्न केला होता का? याची शहानिशा करण्यासाठी घटनास्थळी तपास पथक पाठवण्यात येणार आहे. पण प्राथमिक वैद्यकीय चाचणीनुसार त्याच्या गळ्यावर दोरीचे वळ होते.

आरोपीला पकडण्यासाठी गावकऱ्यांची मदत

अमितेश कुमार पुढे म्हणाले, स्वारगेट बसस्थानकातील 23 सीसीटीव्ही कॅमेरे व स्थानकाबाहेरील 48 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासल्यानंतर अवघ्या दीड-दोन तासांतच पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली. मागील 2 दिवसांपासून आम्ही आरोपीच्या गावात शोधमोहिम राबवत होतो. काही पोलिस कर्मचारी तिथे तळ ठोकून होते. ते झोपलेही नाही. पण आरोपी तेव्हा सापडला नाही. अखेर आज त्याच्या मुसक्या आवळण्यात यश आले. याकामी मदत करणाऱ्या गावकऱ्यांचे मी अभिनंदन करतो. आम्ही गावाला भेट देऊन तेथील नागरिकांचा सत्कार करणार आहोत. विशेषतः गावासाठी काही करता येईल का? याचाही आमच्या पातळीवर विचार सुरू आहे.

शेवटची टीप देणाऱ्याला 1 लाखाचे बक्षीस

पोलिसांनी या प्रकरणी एकदम शेवटी मिळालेल्या खबरीनुसार आरोपीला अटक केली. त्यात आरोपी कुठेतरी पाणी पिण्यासाठी आल्याचे सांगण्यात आले होते. आरोपी पाणी पिण्यासाठी आला असता तो एका व्यक्तीला दिसला. त्याने ती खबर पोलिसांनी दिली. त्यानंतर आरोपी तेथून पळून गेला. त्यानंतर ड्रोनच्या मदतीने दिसलेल्या त्याच्या दिशेतून त्याला अटक करण्यात आली. त्यामुळे ही खबर देणाऱ्या व्यक्तीला 1 लाखाचे बक्षीस दिले जाईल.

हे ही वाचा…

पुणे स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपीला अटक:मध्यरात्री पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या, गुनाटच्या गावकऱ्यांची तपासात साथ

पुणे – स्वारगेट बसस्टँड परिसरातील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीला अखेर पोलिसांनी अटक केली. शिरूर तालुक्यातील गुनाट गावातून बेड्या ठोकण्यात आल्या. दत्तात्रय गाडे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास त्याला अटक करण्यात आली आहे. वाचा सविस्तर

दत्तात्रय गाडेला नेमके कोणी पकडले?:ग्रामस्थ गणेश गव्हाणे यांचा दावा; म्हणाले- पोलिसांनी भावाला मारले, त्याचा राग होता

मुंबई – स्वारगेट परिसरातील बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे आणि माझा भाऊ सोबत राहत होते. त्यामुळे पोलिसांनी माझ्या भावाला मारहाण करत दत्तात्रय गाडे याची विचारपूस केली. याच रागातून मी आरोपीचा शोध घेत होतो. अखेर आरोपी मला सापडला आणि पळत असताना मी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले, असा दावा गावातील ग्रामस्थ गणेश गव्हाणे यांनी केला आहे. त्यामुळे आता आरोपी नेमका कसा पकडला गेला? याबाबत चर्चा सुरू आहे. वाचा सविस्तर

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp