
राज्यात शासकीय कार्यालयांमधून अनुसूचितजमातीच्या 85 हजार रिक्त जागा तातडीनेभरण्यात याव्यात यासह इतर मागण्यांसाठीमागील 25 दिवसांपासून युवक कल्याणसंघाचे उपोषण सुरू आहे. या आंदोलनासपाठिंबा म्हणून शनिवारी आदिवासी बांधवांनीजिल्हाधिकारी कार्यालयावर मो
.
राज्यातील विविध शासकीय कार्यालयातरिक्त असलेल्या अनुसूचित जमातीसंवर्गातील 85 हजार पदे तातडीने भरावीत.शासकीय व निमशासकीय पदभरतीमध्येअनुसूचित जमातीसाठी जातवैधता प्रमाणपत्रबंधनकारक करावे. जात पडताळणीसमित्यांकडे प्रलंबित असलेल्या सशर्त वैधताप्रकरणांची चौकशी करून तातडीने कारवाईकरावी आदी मागण्यांसाठी आदिवासी युवककल्याण संघाच्या वतीने 16 जुलैपासूनजिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळीउपोषण सुरू आहे. माजी मंत्री शिवाजीरावमोघे, माजी आमदार डॉ. संतोष टारफे, माजीजि. प. अध्यक्ष गणाजी बेले, संजय भुरके,आदिवासी युवक कल्याण संघाचे अध्यक्षडॉ. सतीश पाचपुते, माजी जिल्हा परिषदसदस्या वंदना टारफे आदींनी सरकारच्याविरोधात घोषणाबाजी केली.
राज्यात आदिवासी समाजाचे अनेकप्रश्न प्रलंबित आहेत. या प्रश्नांवरआता मोर्चा नको. पालकमंत्र्यांनाघेराव घालून जाब विचारा, असेआवाहन माजी मंत्री शिवाजीरावमोघे यांनी शनिवारी हिंगोलीतबोलताना केले. राज्यात आदिवासीसमाजाची रिक्त असलेली 85 हजारपदे भरण्याच्या मागणीसह इतरमागण्यांसाठी आदिवासी बांधवांच्यावतीने शनिवारी हिंगोलीत मोर्चाकाढला. जिल्हाधिकारी कार्यालयावरमोर्चा आल्यानंतर माजी मंत्री मोघेयांनी मार्गदर्शन केले.
तीव्र आंदोलनाचा इशारा
मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावरपोहोचल्यानंतर त्या ठिकाणी प्रमुखनेत्यांनी मार्गदर्शन केले. आदिवासीसमाजाच्या प्रश्नांची शासनाने सोडवणूककरावी, अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलनकरण्याचा इशारा देण्यात आला आहे.
आता मोर्चा नको, पालकमंत्र्यांना घेराव घाला
राज्यात आदिवासी समाजाची 85 हजार रिक्तपदे भरण्याच्या मागणीसाठी हजारोआदिवासी बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.