
Gautami Patil on Vaishnavi Hagawane: राज्यात सध्या वैष्णवी हगवणे प्रकरण गाजत असून, सर्व आरोपींना अटक करण्यात आलं असून सध्या कोठडीत आहेत. वैष्णवी प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत असताना काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओत राजेंद्र हगवणे यांनी आपल्या बैलाच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात गौतमी पाटील नाचली होती. हा व्हिडीओ व्हायरल झाल्याच्या पार्श्वभूमीवर गौतमी पाटीलने अखेर मौन सोडलं आहे. वैष्णवीबाबत जे झालं ते अतिशय दुर्दैवी आहे असं ती म्हणाली आहे.
“वैष्णवीबाबत जे झालं ते अतिशय दुर्दैवी आहे. माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. अजून नेमकं आरोपी कोण हे कळलेलं नाही. पण आरोपींना कडक शिक्षा झाली पाहिजे. मी वैष्णवीच्याच बाजूने आहे,” असं गौतमी पाटीलने सांगितलं आहे.
‘वैष्णवीचे चॅट वाचले गेले होते, त्यामुळे धावत्या गाडीतून…’, हगवणेंच्या वकिलाचा कोर्टात खळबळजनक दावा, ‘तिची प्रवृत्ती…’
“हगवणे कुटुंबासोबत माझा संबंध फक्त त्या कार्यक्रमापुरता मर्यादित होता. मी एक कलाकार आहे. कलाकाराने एखादा प्रोग्राम केला म्हणून लगेच त्याचा पुढील घटनांशी जोडणं अतिशय चुकीचं आहे. त्यांनी पुढे काही चुकीचे केले असेल, तर त्याची शिक्षा ही झालीच पाहिजे,” असं गौतमी पाटील म्हणाली आहे.
‘सूनेचा छळ केल्यास…’, वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर मराठा समाजाचा मोठा निर्णय; ‘प्री-वेडिंगसारखी घाणेरडी…’
पुढे ती म्हणाली, “होय, मला त्या कार्यक्रमाचे पूर्ण पैसे मिळाले होते. त्यावेळीही माझ्या टीमचाच फक्त त्यांच्याशी संबंध आला होता. माझा काही संबंध नव्हता”.
हगवणे कुटुंबाकडून वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय
आरोपींच्या वकिलांनी कोर्टात वैष्णवीचे चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न केला. “वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत नको ते चॅट सुरु होते, ते आम्ही पकडले होते. त्याची माहिती आम्हाला हवी आहे. आम्हाला न्याय हवा आहे,” असं ते म्हणाले.
‘हे सगळे भोग आहेत…’, वैष्णवी हगवणे प्रकरणावर धनंजय देशमुख स्पष्टच बोलले, कुटुंबाला म्हणाले ‘नुसतं घरी बसून…’
हगवणेंच्या वकिलाने म्हटलं की, “वैष्णवीची आत्महत्या करण्याची प्रवृत्ती होती. तिचे एका व्यक्तीसोबतचे चॅट वाचले गेले होते. त्यातून तिने अनेकदा आत्महत्येचा प्रयत्न केला. एकदा उंदीर मारण्याचं औषध खाऊन आणि एकदा गाडीतुन उडी मारून तिने आत्महत्येचा प्रयत्न केला होता”.
दरम्यान यावेळी वकिलाने बायकोला कानाखाली मारणं छळ नाही असा अजब युक्तिवाद केला. “एखाद्या नवऱ्याने आपल्या बायकोला चार कानाखाली मारल्या म्हणजे छळ ठरत नाही,” असा युक्तिवाद त्याने वैष्णवीच्या अंगावरील व्रणांसदर्भात बोलताना केला.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.