digital products downloads

हर्षवर्धन सपकाळांमुळे भाजपच्या बुडाला आग: ठाकरे गटाच्या सुषमा अंधारेंचा घणाघात; राहुल नार्वेकर यांच्या VIDEO कडे वेधले लक्ष – Maharashtra News

हर्षवर्धन सपकाळांमुळे भाजपच्या बुडाला आग:  ठाकरे गटाच्या सुषमा अंधारेंचा घणाघात; राहुल नार्वेकर यांच्या VIDEO कडे वेधले लक्ष – Maharashtra News

भाजपने टिपू सुलतानच्या मुद्यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरोधात छेडलेल्या आंदोलनाचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी खरपूस समाचार घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पराक्रम एकमेवाद्वितीय

.

प्रत्येक गोष्टीत धर्म आणणे भाजपचा जुना फंडा:हर्षवर्धन सपकाळ यांचा पलटवार; भाजपच्या जाहिरनाम्यात ‘टिपू’चा फोटो असल्याचा आरोप

हर्षवर्धन सपकाळ यांनी कथितपणे टिपू सुलतान यांची तुलना कथितपणे छत्रपती शिवाजी महाराजांशी केली होती. भाजपने या प्रकरणी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. या पार्श्वभूमीवर सुषमा अंधारे यांनी काँग्रेसची बाजू घेत भाजपचा खरपूस समाचार घेतला आहे. मुलुंड येथील मेट्रो स्लॅबची दुर्घटना व राहुल नार्वेकरांच्या व्हिडिओवरून लक्ष हटवण्यासाठी भाजप टिपू सुलतानच्या मुद्यावर हेतुपुरस्सर आंदोलन करत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. सुषमा अंधारे आपल्या पोस्टमध्ये म्हणाल्या, छत्रपती शिवरायांचा पराक्रम एकमेव द्वितीय आहे. याबद्दल दुमतच नाही .

पण काल मुलुंडला झालेल्या मेट्रो स्लॅबच्या दुर्घटनेला झाकण्यासाठी आणि राहुल नार्वेकरांचा दादागिरी करतानाचा व्हिडिओ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ साहेब यांनी शेअर केल्याने भाजपच्या बुडाला आग लागलेली आहे. एकाच वेळी मेट्रो दुर्घटना आणि नार्वेकर या दोन्ही बातम्यांवरील जनतेचे लक्ष हटवण्यासाठी भाजपाला ही सगळी नौटंकी करावी लागत आहे.

भाजपने सगळी गुंडागर्दी कोरटकरसाठी राखीव ठेवली असती

भाजप कार्यकर्त्यांच्या मनात खरंच जर छत्रपती शिवरायांच्या बद्दल एवढं प्रेम, आपुलकी आणि आदर असता तर त्यांनी आज जे पुण्यात आंदोलन केलं हे आंदोलन त्यांनी खूप आधी भगतसिंह कोश्यारींच्या समोर राज्यपाल भवनला केले असते. ही सगळी जी तोडफोड आहे किंवा आत्ताची जी सगळी गुंडागर्दी आहे ती कदाचित प्रशांत कोरटकरसाठी त्यांनी राखीव ठेवली असती.

ज्या भाजपच्या नेते म्हणवणाऱ्या फडणविसांनी छत्रपती शिवरायांच्या अवमानाबद्दल सभागृहात साधा निंदा व्यंजक ठराव मांडला नाही त्यांना खरेच आज नौटंकी करण्याचा नैतिक अधिकार आहे का? मेट्रो दुर्घटना आणि कालचे राहुल नार्वेकरांचे प्रताप झाकण्यासाठी भाजप आत्ता हा सो कॉल्ड ड्रामा उभा करत आहे. कुठलेही विकास काम आम्हीच केलं असं म्हणून क्रेडिट घ्यायला पुढे येणारे फडणवीस कालच्या दुर्घटनेनंतर साधं ट्विट ही करायला पुढे आले नाहीत, त्यावर आधी भाजपच्या गल्लाभरू प्रवकत्यांनी उत्तरे दिली पाहिजेत, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.

येड्याची जत्रा पेढ्याचा पाऊस

सुषमा अंधारे यांनी अन्य एका पोस्टद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही निशाणा साधला आहे. या प्रकरणी त्यांनी येड्याची जत्रा पेढ्याचा पाऊस हा हॅशटॅग वापरला आहे. अरे हे किती गुणी आणि कर्तव्यदक्ष लोक आहेत. मुंबईच्या महापौर रीतू तावडे गृहमंत्री फडणवीस यांची कामे करत आहेत. तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे महसूल खात्याची कामे करत आहेत. तेसुद्धा शेतकरी घरात नसताना. नार्वेकर आणि रितू तावडे यांची कर्तव्यदक्षता बघितली तर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस हे लोक अगदीच निरुपयोगी ठरतात. असं असेल तर मग यांची खाती काढून या दोघांनाच द्यायला हवीत, असे अंधारे यांनी उपरोधिकपणे म्हटले आहे.

हे ही वाचा…

पुण्यात भाजप – काँग्रेसच्या आंदोलनात दगडफेक:2 कार्यकर्त्यांसह पोलिस अन् पत्रकारही जखमी; महापौरांच्या हजेरीत हल्ला – काँग्रेस

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केल्याचे तीव्र पडसाद रविवारी पुण्यात उमटले. येथे भाजप व काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांविरोधात रस्त्यावर उतरले होते. त्यात दोन्ही बाजूंनी एकमेकांवर दगडफेक केली. त्यात काँग्रेसचे 2 कार्यकर्ते जखमी झाले. या प्रकरणी स्थिती हाताबाहेर जात असल्याचे दिसताच पोलिसांनी हस्तक्षेप केला. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. वाचा सविस्तर

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp