digital products downloads

हलणारं विमान, किंचाळणारे प्रवासी; अपघाताआधीचा फोटो आला समोर? जाणून घ्या सत्य

हलणारं विमान, किंचाळणारे प्रवासी; अपघाताआधीचा फोटो आला समोर? जाणून घ्या सत्य

Air India Plane Crash: 12 जून 2025 रोजी अहमदाबादमध्ये झालेल्या भीषण विमान अपघाताने संपूर्ण देशाला हादरवून टाकले. अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान AI171 हे उड्डाणानंतर काही सेकंदातच बीजे मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहात कोसळले. या अपघातात 241 प्रवासी आणि क्रू मेंबर्ससह किमान 270 जणांचा मृत्यू झाला. दरम्यान एक फोटो सोशल मीडियात व्हायरल होत असून तो अहमदाबात विमान अपघातातील असल्याचा दावा करण्यात येतोय. पण काय आहे यामागचं सत्य? जाणून घेऊया.

विमानातील दृश्य

या दुर्घटनेतून फक्त एक प्रवासी, ब्रिटिश नागरिक विश्वासकुमार रमेश बचावला. अपघातानंतर सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले. ज्यामध्ये अपघातापूर्वी विमानात घेतलेला एक फोटो देखील आहे. यामध्ये राजस्थानमधील एका डॉक्टर कुटुंबातील मुले ओरडताना दिसतोय. व्हायरल झालेल्या फोटोत विमानाच्या केबिनचे दृश्य दिसतंय. ज्यामध्ये काही मुले आणि लोक घाबरलेले आणि ओरडताना दिसत आहेत. हा फोटो राजस्थानमधील एका डॉक्टर कुटुंबाचा आहे. जो अपघाताचा बळी ठरला, असा दावा करण्यात आलाय. हा फोटो सोशल मीडियावर हजारो वेळा शेअर करण्यात आला. 

फॅक्ट चेकमध्ये आलं समोर

पण हा फोटो पूर्णपणे बनावट असल्याचे आढळून आले आहे. हा फोटो आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) ने तयार केले आहे. या फोटोच्या फॅक्ट चेकमध्ये तो AI-निर्मित असे आढळून आले आहे. हायव्ह मॉडरेशन आणि ट्रूमीडिया सारख्या अनेक एआय डिटेक्शन टूल्सनी पुष्टी केली. फोटोतील लोक आणि फोटो खरा नाही. सीटचा रंग, केबिनची रचना आणि फोटोतील लोकांच्या चेहऱ्यावरील हावभाव एअर इंडियाच्या बोईंग 787-8 ड्रीमलाइनरच्या मानक लाल थीमशी जुळत नसल्याचेही फॅक्ट चेकमध्ये समोर आलाय. 

त्याचप्रमाणे दुसऱ्या दाव्यात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांचा फोटो अपघातापूर्वीचा शेवटचा फोटो असल्याचा दावा करण्यात आला आहे. हा फोटो 2021 चा होता. जेव्हा एका महिला प्रवासी लीना गोस्वामी यांनी लंडनला जाणाऱ्या उड्डाणादरम्यान तो काढला होता. पोलिसांनी आणि तपास संस्थांनीही हे व्हायरल दावे फेटाळून लावले आहेत. 

ब्लॅक बॉक्समधून होणार उलगडा

अहमदाबाद पोलिसांच्या वरिष्ठ अधिकारी विशाखा डबराल यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. अपघातानंतर विमानाच्या आतील कोणताही फोटो सापडला नाही. अपघाताची चौकशी करण्यासाठी भारताच्या विमान अपघात तपास ब्युरो (AAIB) ने ब्लॅक बॉक्स घेतला आहे. ज्यामध्ये फ्लाइट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर समाविष्ट आहे. ही उपकरणे  इंजिन बिघाड किंवा विंग फ्लॅप्सची बिघाड अशा अपघाताचे कारण निश्चित करण्यात मदत करतील, असे ते म्हणाले.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp