digital products downloads

हवा विजयाचा हात तर धरा मनसेची साथ

हवा विजयाचा हात तर धरा मनसेची साथ

ब्युरो रिपोर्ट झी 24 तास : कायदा हातात घेणाऱ्यांसोबत जाणार नाही म्हणत काँग्रेसने मुंबईत स्बवळाचा नारा दिलाय.. तर शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षासोबत जाण्यासाठी काँग्रेसचे नेते अजुनही उत्सुक असल्याचं पाहायला मिळतंय.. मात्र काग्रेसच्या नेत्यांची जरी ही भूमिका असली तरी मविआला मुंबईत मनसेशिवाय बहुमत मिळणं कठिण असलयाचं बोललं जातं आहे.  2017 च्य़ा मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या आकडेवारीवरून असं विश्लेषण केलं जातंय..  

Add Zee News as a Preferred Source

राज्यातील पक्ष महापालिकांच्या निवडणुकीच्या तयारीला लागलेत. सर्वच पक्षांचं खास लक्ष लागलंय ते म्हणजे मुंबई महापालिकेवर. मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधू 20 वर्षांची राजकीय कटूता बाजुला सारून एकत्र आलेत. शिवसेना UBT आणि मनसेच्या युतीची अधिकृत घोषणा बाकी असली तरी युती होणार हे निश्चित आहे. मात्र त्यामुळे लोकसभा आणि विधानसभेला एकसंध असलेल्या मविआमध्ये मात्र यामुळे माशी शिंकलीय. मनसेसोबत न जाण्याचा निर्णय घेत राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी स्वबळाचा नारा दिलाय.. कायदा हातात घेणाऱ्यांसोबत जाणार नसल्याचं मुंबई काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी जाहिर केलंय… मात्र एकीकडे उद्धव ठाकरे आणि शरद पवारांसोबत जाण्यासाठी काँग्रेसचे नेते सकारात्मक आहेत. मात्र राज ठाकरे नकोत या भूमिकेवर काँग्रेस नेते ठाम आहे. त्यातही काँग्रेस नेत्यांमध्ये दोन मतप्रवाह असल्याचं पाहायला मिळतंय..
काग्रेसच्या नेत्यांची जरी ही भूमिका असली तरी मविआला मुंबईत मनसेशिवाय बहुमत मिळणं कठिण असलयाचं बोललं जातंय… 2017 च्य़ा मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या आकडेवारीवरून असं विश्लेषण केलं जातंय..  मुंबईतील २२ प्रभागांतील मतदानाच्या आकडेवारीत मनसेचा प्रभाव स्पष्टपणे पाहायला मिळतोय. अनेक ठिकाणी भाजप आणि मविआ यांच्यातील मतांमध्ये काहीसा फरक असताना मनसेची मते 2 ते 6 हजारांच्या दरम्यान आहेत. त्यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेशिवाय मविआला बहुमत मिळवणे कठीण असल्याचे बोललं जातंय.. 

मुंबईत मनसेशिवाय मविआला बहुमत कठीण

या ठिकाणी मनसेची ताकद

प्रभागभाजप      शिवसेना UBT+काँग्रेस  मनसे

माहीम191       994673247115

दिंडोशी  396987          6985                          1181

गोरेगाव 5111,131      10055                          1339

वर्सोवा 6111,267      11,1111166

जोगेश्वरी पूर्व 5375427502727

विलेपार्ले88993382943011

कलिना91101919709740

भांडुप पश्चिम1091003995272863

घाटकोपर पश्चिम 1231105193505881

घाटकोपर पूर्व  12512980120691519

अणुशक्तीनगर  1441030046776850

चांदिवली  16017575151993397 या आकडेवारीवरूनही काँग्रेसमध्ये मतभेद असल्याचं पाहायला मिळालं. मनसेसोबत जाण्यासाठी सकारात्मक असलेल्या विजय वडेट्टीवार यांनी हा चेंडू आता मुंबईच्या नेत्यांकडे टोलवलाय.. तर विश्लेषणापेक्षा ग्राऊंडवरील परिस्थितीत वेगळी असू शकते असं म्हणत वर्षा गायकवाड आपल्या निर्णयावर ठाम असल्याचं पाहायला मिळतंय. 

तर मुंबईत सगळ्याच पक्षांची ताकद आहे..युती आघाडी झाली तर विजय होत असतात असं म्हणत मविआवर बोलताना शिवसेना नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी महायुतीच्या नेत्यांनाही अप्रत्यक्ष हा सल्ला दिल्याचं पाहायला मिळतं आहे. 

मुंबई आणि उपनगरात मनसेची ताकद आहे हे कुणीही नाकारू शकत नाही.  मविआने जर मनसेची साथ घेतली तर मुंबईत मविआला त्याचा फायदा होणार यात काहीही शंका नाही.. आता ही आकडेवारी पाहिल्यानंतर काँग्रेस नेते मनसेला सोबत घेण्यासंदर्भात काही फेरविचार करतात का हे पाहणं महत्वाचं ठरमार आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp