
Sanjay Gaikwad : आमदार संजय गायकवाडांनी कॅन्टीनमधील कामगाराला मारहाण केली. दोन दिवसांनंतरही आमदार संजय गायकवाडांवर गुन्हा का दाखल करण्यात आला नाही असा सवाल उपस्थित होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत कारवाईचे संकेत दिले होते. मात्र, अद्याप गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. घडलेल्या प्रकाराचा कसलाही पश्चाताप नसल्याचं त्यांनी म्हटलंय.. त्यामुळे आमदार गायकवाड माफी मागणार नसल्याचं स्पष्ट केले.
रस्त्यावरच्या गुंडपुंडासारखे आमदार निवासातल्या कॅन्टीनमध्ये मारामारी करणा-या आमदार संजय गायकवाडांनी स्वतःची आणि पक्षाची चांगलीच शोभा केली.. महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत राज्याचा आमदार कॅन्टीनमध्ये मारामारी करतो यातून काही चांगला संदेश जात नाही. संजय गायकवाडांनी मारामारी केली त्यामुळं त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी विरोधकांनी केली. मारहाणीला दिवस उलटूनही त्यांच्यावर पोलिसांत साधी तक्रारही दाखल झालेली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही या प्रकरणी आमदारांवर कारवाई करण्याचे संकेत विधान परिषदेत दिले होते.
फडणवीसांनी जाहीररित्या कान टोचल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही संजय गायकवाडांची शाळा घेतल्याची माहिती आहे. संजय गायकवाडांना एवढं फटकारूनही संजय गायकवाड मात्र आपल्यात तो-यात दिसले. कॅन्टीन चालकाविरोधात आवाज उठवल्यानं त्याच्यावर कारवाई झाल्याचा दावा गायकवाड करतायात. कॅन्टीनमध्ये बनियन टॉवेलवर मारहाण करुन मोठं बक्षीस मिळवल्याचा आविर्भाव संजय गायकवाडांचा होता. कोणत्याही पश्चातापाचा लवलेश त्यांच्या चेह-यावर नव्हता. शिळं अन्न वाढणा-या कॅन्टीनवर कारवाई झाली ती बरीच झाली. कारवाई ही व्हायलाच पाहिजे होती. पण महाराष्ट्रातल्या एका आमदारानं जेवणाच्या मुद्यावर गुंडासारखी मारहाण करणं हे काही शोभणारं नाही. जर गायकवाडांवर कोणतीच कारवाई झाली नाही तर त्याचा एक वेगळाच संदेश महाराष्ट्रात जाण्याची भीती आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.