digital products downloads

हाती शस्त्र, डॉक्टरांना मूर्ख म्हणणाऱ्या जैन मुनींवर नेते कडाडले; ‘देवेंद्रजी जे पेराल ते उगवतं’ म्हणत इशारा

हाती शस्त्र, डॉक्टरांना मूर्ख म्हणणाऱ्या जैन मुनींवर नेते कडाडले; ‘देवेंद्रजी जे पेराल ते उगवतं’ म्हणत इशारा

Jain community kabutarkhana news : कबुतरांच्या विष्ठेमुळे माणसं मरतात म्हणणाऱ्या डॉक्टरांना मी मूर्ख समजतो,  असं वक्तव्य मुंबईतील धर्मसभेत जैनमुनी कैवल्य महाराज यांनी केलं. एखाद दुसरं व्यक्ती दगावल्यानं काही होत नसल्याचं म्हणत त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानं आता नव्या वादाला वाचा फोडली आहे. मुंबईतील कबुतरखाने बंद केल्यानं मृत्यू झालेल्या कबुरांसाठी जैन धर्मगुरुंकडून आयोजित करण्यात आलेल्या प्रार्थनासभेदरम्यान जैन मुनी आणि धर्मगुरुंनी ही वक्तव्य केली. 

Add Zee News as a Preferred Source

‘साधूसंतांमुळं फडणवीस CM पदी’

‘साधू संतांनी फडणवीसांना सीएम केलं’ असं म्हणत आम्ही रस्त्यावर उतरलो, प्रचार केला म्हणून ते मुख्यमंत्री झाले, अशा शब्दांत थेट CM फडणवीसांचा उल्लेख करणाऱ्या धर्मगुरुंच्या या वक्तव्याचा आणि एकंदरच जैन मुनींच्या या प्रकरणी असणाऱ्या भूमिकेचा राजकीय वर्तुळातून कडाडून विरोध करण्यात आला. भाजप आमदार मनिषा कायंदे यांनी जैन मुनींनी मुख्यमंत्र्यांसंदर्भात केलेल्या य़ा वक्तव्यांविरोधात नाराजीचा सूर आळवला. 

‘यांच्याच हाती देऊ आता सर्व…’ म्हणत कायंदेंचा संतप्त सूर

‘एका धर्मगुरूनं असं म्हटलं आहे डॉक्टर मूर्ख आहेत. मग आरोग्य खातं आपण बंद करून, डॉक्टरांच्या पदव्या काढून घेऊन जनतेला घरी बसवूया… वाऱ्यावर सोडूया जनतेला. यांच्या (धर्मगुरुंच्या) हातात सर्व देऊ. कोरोना काळात आरोग्य खात्यानं, डॉक्टरांनी आपल्याला वाचवलं. जैन डॉक्टरांचं या साऱ्याला समर्थन आहे का? तर याचं उत्तर आहे नाही. आपण अनेक जैन डॉक्टरांशी संवाद साधला असून, त्यांना हे बिलकुल पटत नाही. मात्र धर्माविरोधात बोलू नये यासाठी ते शांत आहेत’, असं त्या म्हणाल्या. 

‘दुसरी गोष्ट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी जनतेसाठी अपार मेहनत केली. याचं श्रेय एकट्या कोणी घेणं चुकीचं आहे. मुंबई मनपाला कोणी आदेश दिला, की प्रत्येक वॉर्डात कबुरतरांना खायला घालता येईल अशी जागा शोधा? तज्ज्ञ समितीचा अहवाल अजून आलेला नाही. किंबहुना मुंबईत अशी एकही जाहा नाही. एखाद्या जैन धर्मगुरुच्या कुटुंबातील व्यक्तीचा फुफ्फुसांच्या आजारानं मृत्यू झाला असता तर ते असं बोलले असते का? तुमच्या घरातलं कोणी दगावलं नाही म्हणून बोलणं सोपं आहे, मात्र हा रोग जीवघेणा आहे तरीही हे सर्व सुरू ठेवणं हा अविवेकीपणा आहे. तिथं मराठवाजड्यात पूर आलाय, गुरंढोरं वाहून गेलियेत त्या मराठवाड्याला मदत करा’, असा थेट सूर कायंदे यांनी आळवला. 

देवेंद्रजी जे पेराल ते उगवतं- सुषमा अंधारे 

ही सर्व भाषणं ऐकल्यानंतर जैन धर्मियांचं तत्त्वंज्ञान आणि त्या तत्त्वज्ञानाला सुरंग लावणारी ही वक्तव्य आहेत का? हाच प्रश्न शिवसेना UBT उपनेच्या सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला. ज्या जैन धर्मात जीव हत्या पाप सांगण्यात येतं, कायिक, ऐच्छिक कोणत्याही प्रकारचं पाप आमच्याकडून होणं नाही. ‘एखाद्याला वाईट बोलूनही त्यांचं मन दुखावणंही हत्येचं द्योतक आहे असं शिकवणाऱ्या धर्मात ही माणसं हाती शस्त्र घेण्याची भाषा करत असतील तर ही अत्यंत वेदनादायी बाब आहे. आजवर इतके निष्पाप बळी गेले मात्र त्यांच्यासाठी कधी अशा धर्मसभा बोलवण्यात आल्या नाहीत. कबुतरांसाठी जे केलं जात आहे ते चमत्कारिकच आहे’ असं म्हणत ‘देवेंद्रजी जे पेराल ते उगवतं’ असा टोला त्यांनी लगावला. पेरणी त्यांची आहे त्यामुळं उगवण कशी असावी त्यावर त्यांनी तोडगा काढला पाहिजे असा सूचक इशारा अंधारे यांनी दिला. 

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp