
Maharashtra Weather News : बंगालच्या उपसागरात पुन्हा तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात शनिवारपासून मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ज्याचा सर्वाधिक परिणाम मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांवर होणार असून, इथं अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून पावसानं विश्रांती घेतली असली तरीही आता मात्र, पुढील 24 तासांमध्ये प्रामुख्यानं दक्षिण कोकणामध्ये काही दुर्गम भागांमध्ये मुसळधार पावसाची हजेरी असेल. तर, दक्षिण मध्य महाराष्ट्र, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाच्या मध्यम स्वरुपातील सरींची हजेरी असेल. दरम्यानच्या काळात वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 40 किमी राहणार असल्याच कारणानं किनारपट्टी भागांतील गावं, शहरांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.
Thunderstorm accompanied with lightning, Light to Moderate rain and gusty winds 30-40 kmph very likely to occur at isolated places in the districts of North Madhya Maharashtra.
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया.
https://t.co/jw7yrf9chD भेट घ्या. pic.twitter.com/PnsMEl1Dbk
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) September 12, 2025
पावसाचा हा जोर शनिवार, रविवार आणि काही अंशी सोमवारपर्यंत कायम राहणार आहे असा प्राथमिक अंदाज वर्तवत ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या उत्तरेकडे निर्माण झालेलं कमी दाबाचं क्षेत्र पुढील 48 तासांमध्ये पश्चिम वायव्येस पुढे जाणार असल्याच कारणानं राज्याच्या अंतर्गत भागांसह कोकणालाही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
रविवारी अतिमुसळधार… काळजी घ्या!
रविवार हा सुट्टीचा वार असल्या कारणानं अनेक मंडळी भटकंतीचा बेत आखत असतील. मात्र पाऊस त्यांची तारांबळ उडवू शकतो. कारण, रविवारी राज्यातील ठाणे, मुंबईसह, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला असून, कोल्हापूर, सातारा, पुण्यातीच घाट क्षेत्र, परभणी, बीड, जालना इथंही ढगांच्या गडगडाटासह पावसाची हजेरी असेल असा इशारा देण्यात आला आहे.
मुंबईत थंडी? (Mumbai Weather Update)
दमदार पावसानंतर मुंबई शहरात मागील काही दिवस पावसानं उघडीप दिली असली तरीही गेल्या 24 तासांमध्ये एकाएकी शहरातील तापमानात घट नोंदवण्यात आली. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रानं हा आकडा 29.7 अंश सेल्सिअसवर असल्याचं सांगितलं. पहाटेच्या वेळी शहरात थंड वाऱ्यांचे झोत येत असल्यानं हे अनपेक्षित वातावरण नागरिकांना मात्र दिलासा देऊन जात आहे. तर, नवी मुंबई परिसरातही अशीच काहीशी स्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे.
FAQ
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पावसाचा काय अंदाज?
बंगालच्या उपसागरात पुन्हा तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे शनिवारपासून (१३ सप्टेंबर २०२५) मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हा पाऊस शनिवार, रविवार आणि सोमवारपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे.
कोणत्या भागांमध्ये पावसाचा सर्वाधिक परिणाम होईल?
मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरीसारख्या कोकणातील जिल्ह्यांवर अतिमुसळधार पावसाचा सर्वाधिक परिणाम होईल. दक्षिण कोकणातील दुर्गम भागांमध्ये पुढील २४ तासांत मुसळधार पाऊस पडेल, तर दक्षिण मध्य महाराष्ट्र, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे.
रविवारी (14 सप्टेंबर 2025) पावसाचा अंदाज काय?
रविवारी मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी येथे अतिमुसळधार पावसाचा इशारा आहे. कोल्हापूर, सातारा, पुण्याच्या घाट क्षेत्रात, तसेच परभणी, बीड, जालना येथे ढगफुटीसह मुसळधार पाऊस पडू शकतो. सुट्टीचा दिवस असल्याने बाहेर पडण्यापूर्वी हवामान अंदाज तपासावा.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.