
हिंगोली जिल्हा पोलिस दलाच्या 64 पदासाठी पात्र ठरलेल्या 411 उमेदवारांची रविवारी ता. 29 लेखी परीक्षा आदर्श महाविद्यालयात घेतली जाणार आहे. यावेळी उमेदवारांनी कुठल्याही प्रकारची स्मार्ट उपकरणे आणू नये, तसेच गैरप्रकाराचा प्रयत्न केल्यास तातडीने कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक निलाभ रोहन यांनी दिली आहे. जिल्हा पोलिस दलातील 64 रिक्त पदांसाठी 11 फेब्रुवारी पासून भरती प्रक्रिया राबवली जात आहे. सदर प्रक्रियेत कागदपत्रे पडताळणी, मैदानी चाचणी घेण्यात आली. विशेष म्हणजे वाढत्या उन्हाची तीव्रता लक्षात घेता जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी पहाटे चार वाजल्यापासूनच भरती प्रक्रिया सुरु केली होती. त्यामुळे मैदानी चाचणीसाठी आलेल्या उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, मैदानी चाचणी नंतर लेखी परिक्षेसाठी 411 उमेदवार पात्र ठरले आहे. या उमेदवारांची लेखी परीक्षा रविवारी ता. 29 सकाळी आकरा ते दुपारी साडेबारा यावेळेत होणार आहे. यासाठी उमेदवारांना सकाळी 9 वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित राहण्याचे सूचना दिल्या आहेत. उमेदवारांनी प्रवेश पत्रावर दिलेल्या सूचनांचे अवलोकन करणे आवश्यक आहे. उमेदवारांनी स्मार्ट डिव्हाईस यामध्ये इलेक्टॅनिक साहित्य, वॉच, हेडफोन, मोबाईल इतर प्रतिबंधीत साहित्या परीक्षा केंद्रावर आणू नये. या ठिकाणी परीक्षा केंद्रावर आलेल्या उमेदवारांची बायोमेट्रीक तपासणी करूनच त्यांना परीक्षा केंद्रात सोडले जाणार आहे. आदर्श महाविद्यालयाच्या 10 खोल्यांमध्ये परीक्षा होणार असून प्रत्येक खोलीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या शिवाय प्रत्येक खोलीत लेखी परिक्षेचे छायाचित्रीकरण केले जाणार आहे. या शिवाय चार कर्मचारी पर्यवेक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. प्रत्येक खोलीमध्ये घड्याळ लावण्यात आले असून त्यामुळे उमेदवारांनी घड्याळ घेऊन येऊ नये. परीक्षा केंद्रावर गैरप्रकार आढळून आल्यास उमेदवारावर कारवाई करून परिक्षेसाठी अपात्र केले जाणार असल्याचे पोलिस अधीक्षक निलाभ रोहन यांनी सांगितले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



