
नर्सी नामदेव येथील संत नामदेव महाराजांच्या पालखी सोहळ्यातील पहिले अश्व रिंगण मंगळवारी ता. १७ सायंकाळी हिंगोलीच्या रामलीला मैदानावर पार पडले. अश्व रिंगणाचा सोहळा डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी शेकडो भाविकांची उपस्थिती होती. यावेळी हरिनामाचा गजर करण्यात
.
नर्सी येथील संत नामदेव महाराजांचा पालखी सोहळा आज सकाळी नर्सी नामदेव येथून हिंगोलीकडे निघाला. घोटा, सवड, केसापूर मार्गे पालखी सोहळा दुपारी चार वाजण्याच्या सुमारास हिंगोली येथे पोहोचला. हिंगोली येथील महाराजा अग्रसेन चौकात पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. पालिका प्रशासनाच्या वतीने मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांनी पालखीचे पुजन केले. यावेळी आमदार संतोष बांगर, माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण, संस्थानचे उपाध्यक्ष भिकाजी कीर्तनकार, सदस्य मनोज आखरे, द्वारकादास सारडा, ॲड. मनिष साकळे, अशोक नाईक, माजी नगरसेविका अनिता सुर्यतळ, चंदू लव्हाळे, बाळू बांगर यांच्यासह भाविकांची उपस्थिती होती.
दरम्यान, टाळ मृदंगाच्या गजरात तसेच हरिनामाचा जयघोष करीत पालखी सोहळा रामलीला मैदानावर पोहोचला. या ठिकाणी पालखी सोहळ्याचे पहिले अश्व रिंगण पार पडले. माजी नगरसेवक अशोक नाईक यांच्या पुढाकारातून परिसरातून अश्व बोलावण्यात आले होते. अश्व रिंगणाचा सोहळा पाहण्यासाठी शेकडो भाविकांची गर्दी झाली होती. रामलीला मैदानावर हरिनामाचा गजर करीत भाविकांनी फुगडी खेळण्याचा मनसोक्त आनंद लुटला. त्यानंतर सुमारे १२ अश्वांच्या माध्यमातून रिंगण सोहळा पार पाडला. डोळ्याचे पारणे फेडणारा हा सोहळा भाविकांनी डोळ्यात साठवून ठेवला. या पालखी सोहळ्याचा हिंगोलीत मुक्काम झाल्यानंतर पालखी बुधवारी ता. १८ औंढा नागनाथकडे रवाना होणार आहे.
हे ही वाचा…
हिंगोलीत विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी गणवेश नाहीच:निष्काळजीपणाच्या कारणावरून गटशिक्षणाधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस
जिल्ह्यातील शाळांमधून पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश वाटप का झाले नाही, गटशिक्षणाधिकाऱ्यांनी निष्काळजीपणा का केला असा सवाल करीत त्यांना तातडीने नोटीस देण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांनी मंगळवारी ता. 17 शिक्षण विभागाच्या बैठकीत दिल्या आहेत. पूर्ण बातमी वाचा…
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.