digital products downloads

हिंगोली जिल्ह्याचा विकास: जिल्हा नियोजन समितीला मिळालेला 311 कोटी रुपयांचा निधी खर्च, गतीमान प्रशासनाचा अनुभव – Hingoli News

हिंगोली जिल्ह्याचा विकास:  जिल्हा नियोजन समितीला मिळालेला 311 कोटी रुपयांचा निधी खर्च, गतीमान प्रशासनाचा अनुभव – Hingoli News



हिंगोली जिल्हा नियोजन समितीला मागील आर्थिक वर्षात मिळालेला ३११ कोटी रुपयांचा निधी खर्च झाला असून ता. ३१ मार्च अखेर १०० टक्के निधी खर्च झाल्याने जिल्हा प्रशासनाचा गतीमानतेचा अनुभव यंत्रणेला आला आहे. या निधीतून मोठ्या संख्येने विकास कामे केली जात आहेत. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत हिंगोली जिल्ह्यासाठी मागील आर्थिक वर्षात शासनाच्या नियोजन विभागाने ३११ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. यातून पालकमंत्री नरहरी झिरवाळ, खासदार नागेश पाटील आष्टीकर, आमदार तान्हाजी मुटकुळे, आमदार संतोष बांगर, आमदार राजेश नवघरे, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा परिषदेेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, जिल्हा नियोजन अधिकारी अनिता लव्हारे यांनी सर्व यंत्रणांकडून विकास कामांचे प्रस्ताव मागवून त्यांना मंजुरी दिली आहे. त्यानुसार जिल्हयात विकास कामांना सुरवात झाली आहे. दरम्यान, शासनाकडून प्राप्त झालेला सर्व ३११ कोटी रुपयांचा निधी यंत्रणांना देऊन खर्च करण्यात आला आहे. यामध्ये जलसंधारण विभागाला ६.५० कोटी, पशुसंवर्धन विभाग ९.९२ कोटी, वन विभाग २९ कोटी, शिक्षण विभाग २७ कोटी, आरोग्य विभाग ४४ कोटी, नगर विकास विभाग ४० कोटी, महिला बालकल्याण विभाग ११.६१ कोटी, ऊर्जा विभाग १८.५० कोटी, रस्ते दुरुस्तीसाठी २३.५० कोटी, इमारत बांधकामसाठी १५ कोटी, यात्रा व तिर्थक्षेत्रासाठी ८.५० कोटी, पर्यटन १२ कोटी, पोलिस विभाग ९ कोटी, रस्ते सुरक्षा विभाग १.५० कोटी रुपयांचा निधी वाटप झाला आहे. दरम्यान, नियोजन विभागाने १०० टक्के निधी खर्च झाल्याचे जिल्हा नियोजन अधिकारी अनिता लव्हारे यांनी स्पष्ट केले. यामध्ये आता विकास कामे सुरु असून चालू आर्थिक वर्षात ३३८ कोटींचा आराखडा असल्याचे त्यांनी सांगितले.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp