
हिंगोली शहरासह जिल्हाभरात हिंगोली शहरात गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी ता. २७ सकाळपासूनच गणेश मूर्ती खरेदीसाठी भक्तांनी मोठी गर्दी केली होती. पावसाचा जोर असतानाही गणेशभक्तांचा उत्साह कमी झाला नाही. रात्री आठ वाजेपर्यंत 500 ठिकाणी गणेश मूर्तीं
.
हिंगोली शहरासह जिल्हाभरात गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर अमरावती व इतर भागातून आकर्षक गणेश मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध झाल्या होत्या. शहरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये महात्मा गांधी चौक, छत्रपती शिवाजी पुतळा चौक, इंदिरा गांधी चौक, खटकाळी बायपास या ठिकाणी मूर्ती विक्रीसाठी लहान-मोठ्या विक्रेत्यांनी स्टॉल्स लावले होते. लहान घरगुती मूर्तींपासून ते देखाव्यांसह मोठ्या मंडळाच्या मूर्तींपर्यंत सर्व प्रकारच्या मूर्तींचा समावेश होता. सकाळी ७ वाजल्यापासूनच गणेश भक्तांची बाजारात गर्दी सुरू झाली होती. महात्मा गांधी चौकातील परिसर गणेश भक्तांनी फुलून गेला होता. आकर्षक गणेश मूर्ती सह फुलांची हार व मखर आदी साहित्य विक्रीची दुकाने थाटण्यात आली होती.
गणेश मंडळांनी गणेश मूर्ती घेतल्यानंतर ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढून मूर्ती स्थापना केली. विशेष म्हणजे भर पावसातही भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरयाच्या गजरामध्ये काढण्यात आलेल्या मिरवणुका सायंकाळी उशिरापर्यंत सुरूच होत्या. हिंगोली शहरातील हिंगोलीचा राजा गणेश मंडळाने सर्वात उंच 12 फुटी गणेश मूर्ती स्थापन केली आहे.
हिंगोली येथील मोदकाचा गणपती म्हणून प्रसिद्ध असलेल्या विघ्नहर्ता चिंतामणी गणपतीची पालखी मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातून काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये बाल वारकरी टाळ मृदंगाच्या गजरात सहभागी झाले होते.
दरम्यान शहरासह जिल्हाभरात रात्री आठ वाजेपर्यंत सुमारे ५०० ठिकाणी गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना झाल्याची माहिती पोलिस प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. मागील वर्षी जिल्हाभरात 1464 ठिकाणी गणेश मंडळाची स्थापना झाली होती. यावर्षीही तेवढ्याच गणेश मूर्ती स्थापन होतील अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. अनेक मंडळांनी यावर्षी पर्यावरणपूरक गणेश मूर्तींची स्थापन केल्या आहेत.
पोलिस प्रशासनाने जिल्हाभरात चोख पोलिस बंदोबस्त ठेवला असून स्थानिक पोलिसांसोबतच राज्य राखीव दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय दंगा काबू पथक सतर्क ठेवण्यात आले असून छेडछाडीचे प्रकार रोखण्यासाठी साध्या विषयातील पोलिस कर्मचाऱ्यांची गस्त पुढील दहा दिवसापर्यंत राहणार असल्याचे पोलिस विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.