
हिंगोली येथील जिल्हा व सत्र न्यायालयात शनिवारी ता. १४ आयोजित महालोकअदालतीमध्ये मोटार अपघात प्रकरणातील ६५ प्रकरणांमध्ये तडजोड होऊन पीडित कुटुंबांना जलद न्याय मिळाला आहे. यामध्ये एका प्रकरणात सर्वात जास्त ५७ लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळाल्याची माहिती ॲड. सुरेश गडदे यांनी दिली आहे. हिंगोलीतील जिल्हा व सत्र न्यायालयात प्रमुख जिल्हा न्यायाधीश टी. एस. अकाली, जिल्हा न्यायाधीश एस. एन. माने, गाडेकर, जिल्हा न्यायाधीश आर. एस. रोटे यांच्या मार्गदर्शनाखाली महालोकअदालत झाली. यावेळी मोटार अपघात व इतर प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. या प्रकरणांमध्ये विमा कंपनीकडून तडजोडीसाठी ओरिएंटल इन्शुरन्सच्या लीगल हेड इंचार्ज रमा गरडेकर, चोलामंडल इन्शुरन्स कंपनीचे योगेश धसे, रिलायन्स इन्शुरन्सचे चव्हाण, टाटा एआयजीचे आदिनाथ कदम यांचीही उपस्थिती होती. यावेळी एकूण ६५ प्रकरणांमध्ये तडजोड होऊन पीडित कुटुंबांना नुकसान भरपाईचे धनादेश देण्यात आले. विशेष म्हणजे मार्च २०२५ मध्ये समाजितसिंग रघुवंशी यांचा अपघात झाला होता. त्यांच्या वतीने आरती रघुवंशी यांनी ॲ्ड. गडदे यांच्या मार्फत दावा दाखल केला होता. यामध्ये तडजोड होऊन ॲड. गडदे यांच्या पाठपुराव्यामुळे प्रकरण निकाली काढून रघुवंशी कुटुंबाला ५७ लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली. या रकमेचा धनादेश त्यांना देण्यात आला. सांघिक परिश्रमातून काम करणे शक्य एकाच दिवशी ६५ प्रकरणांचा निकाल लावणे हे केवळ माझ्या एकट्याचे यश नसून संपूर्ण टीमच्या कष्टाचे फळ आहे असे मत ॲड. सुरेश गडदे यांनी व्यक्त केले. यासाठी त्यांना सहकारी ॲड. मनीषा गडदे, ॲड. मुद्दशीर, ॲड. अर्धापूरकर, ॲड. मस्के, ॲड. जगताप, ॲड. लेकुळे, ॲड. हराळ, पृथ्वीराज आखरे, गुणाराव पोले, कानीफनाथ दिंडे, देवराव कंठाळे, भगवान गडदे, अरविंद गडदे, कृष्णा नरोटे, ओम राऊत, बाबुराव हराळे, गंगाधर लोंढे हर्षद शहा यांनी सहकार्य केले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



