
हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांना शासनाचा उत्कृष्ठ सेवाकर्मी पुरस्कार मिळाल्याबद्दल सोमवारी ता ३० जिल्हा परिषदेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सत्कार केला. राज्य शासनाच्या 150 दिवस कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या हस्ते हिंगोली जिल्हा परिषदेचे सीईओ विवेक गायकवाड यांना शनिवारी मुंबई येथे विशेष कार्यक्रमात सेवाकर्मी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शिरपेच्यात मानाचा तुरा रोवला गेला आहे. हिंगोली सारख्या लहान जिल्ह्यात उत्कृष्ट कामगिरी झाल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी जिल्हा परिषदेचे कौतुक केले. त्यानंतर आज हिंगोली जिल्हा परिषदेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अतिरिक्त सीईओ डॉ. सुधीर ठोंबरे, प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी समृद्धी दिवाने, केशव गड्डापोड, विजय बोराटे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिगंबर माडे, समाज कल्याण अधिकारी गीता गुट्टे, जलसंधारण अधिकारी प्रियंका राजपूत, शिक्षणाधिकारी आसावरी काळे, संदीप सोनटक्के, राजू नरवाडे, ठोंबरे, केंद्रे, पी. व्ही. घंटाराम, प्रफुल्ल खंदारे, विवेक दळवी, सिद्दीकी, नंदकिशोर परिहार, संदीप अन्नदाते, अनिकेत सोनटके, गिरीराज बोथीकर, उदय देशपांडे, सुरेखा जारवाल, एम. डी. पवार आदींची उपस्थिती होती. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नामुळेच जिल्हा परिषदेला यश मिळविता आले आहे. यापुढेही सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे व समन्वयाने काम करून जिल्हा परिषदेचे कामकाज अधिक गतिमान करावे असे आवाहन त्यांनी केले. याशिवाय नागरिकांच्या तक्रारींची तातडीने सोडवणूक करण्याच्या सूचनाही त्यांनी विभागांना दिल्या.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



