
हिंदीविरोधात मनसे आणि ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे. ठाकरे बंधूंनी पत्रकार परिषद घेत हिंदीसंदर्भातली भूमिका स्पष्ट केलीय. महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी शिकवू देणार नसल्याचा इशारा ठाकरे बंधूंनी दिलाय. तर मतांसाठी ठाकरे बंधूंकडून नरेटिव्ह सेट केला जात असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आलाय.
नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी शिकवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. दरम्यान या हिंदीसक्तीविरोधात ठाकरे बंधू मैदानात उतरले आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी पहिलीपासून हिंदी शिकवण्याला कडाडून विरोध केलाय. महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी नकोच म्हणत उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारला इशारा दिलाय. तर राज ठाकरे देखील 5 जुलैला हिंदीविरोधात मोर्चा काढणार आहेत. हा मोर्चा सर्वपक्षीय असून मराठी माणूस या मोर्चाचं प्रतिनिधित्व करणार असल्याचं म्हणत राज ठाकरेंनी सरकारला आव्हान दिलंय.
दरम्यान या मोर्चात सहभागी होण्यासाठी राज ठाकरे उद्धव ठाकरेंसोबत देखील बोलणार आहेत. महाराष्ट्राच्या हितासाठी छोटी-मोठी भांडणं दूर ठेवण्यासाठी तयार असल्याचं राज ठाकरेंनी म्हटलं होतं. दरम्यान या संदर्भातलं चित्र तुम्हाला मोर्चात पाहायला मिळणार असल्याचं सूचक वक्तव्य देखील राज ठाकरेंनी केलंय. तर दुसरीकडे हिंदीविरोधातल्या लढ्यात उतरण्यासाठी उद्धव ठाकरेंनी देखील मराठी माणसांना आवाहन केलंय.
मनसेसोबत ठाकरेंच्या शिवसेनेकडून देखील हिंदीला विरोध करण्यात येतोय. त्यामुळे या सर्वपक्षीय मोर्चात कोण कोण? सहभागी होणार आणि कोण होणार नाही तेही मला बघायचं आहे. असं विधान राज ठाकरेंनी केलंय. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी हिंदीविरोधात घेतलेल्या भूमिकेनंतर भाजपनं त्यांच्यावर टीका केलीय.. मतांसाठी ठाकरे बंधूंकडून हा नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केलाय…
पहिलीपासून हिंदी शिकवण्याला ठाकरे बंधूंनी जोरदार विरोध केलाय. 5 जुलैला हिंदीविरोधा आणि मराठीसाठी सर्वपक्षीय मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. त्यामुळे या मोर्चात कोणकोणता पक्ष सहभागी होणार तसंच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या मोर्चात एकत्र आल्याचं पाहायला मिळणार का? याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.