
फोटो मेटा AI जनरेटेड आहे…
छत्रपती संभाजीनगरमधील पीपल्स एज्युकेशन सोसायटी (PES)च्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्राचार्यांनी विद्यार्थिनींना हिजाब परिधान करण्यास परवानगी दिली नाही, यामुळे संतप्त झालेल्या सहा जणांनी थेट कॉलेजमध्ये घुसून त्यांना धमकावल्याची धक्कादायक घटना समोर आली आ
.
ही घटना सोमवारी (दि. ३० जून) दुपारी घडली. यासंदर्भात प्राचार्य अभिजीत वाडेकर यांनी कँटोन्मेंट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
तक्रारीनुसार, कॉलेजमध्ये परीक्षा सुरू होती. दुपारी सुमारे 1.45 वाजता सहा जण अचानक कॉलेजमध्ये घुसले आणि त्यांनी विद्यार्थिनींना हिजाब घालण्यास मनाई का केली? असा जाब विचारला. त्यानंतर त्यांनी अपशब्द वापरत शिवीगाळही केली व जोरजोरात घोषणाबाजी करत गोंधळ घातला.
या प्रकरणामुळे परीक्षेच्या वेळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी अज्ञात सहा जणांविरोधात धमकी, सार्वजनिक शांतता भंग करणे आणि विनापरवानगी शैक्षणिक संस्थेत घुसखोरी करणे अशा विविध कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास सुरू आहे.
महाविद्यालयाचे प्राचार्य अभिजीत वाडेकर म्हणाले…
आम्ही हिजाब घालण्याची परवानगी देतो. पण महिला विद्यार्थ्यांनी परीक्षेदरम्यान चेहरा झाकू नये अशी अपेक्षा आहे.
दरम्यान, मेरठमध्ये हिजाब घातल्याबद्दल विद्यार्थिनीला परीक्षेपासून वंचित ठेवल्याचा प्रकार समोर आला होता. परीक्षेच्या पहिल्या दिवशी तिला भविष्यात हिजाब न घालण्याची ताकीद देण्यात आली. त्यानंतर मुलीने कसेबसे दोन परीक्षा दिल्या. २१ फेब्रुवारी रोजी भौतिकशास्त्राचा पेपर आणि २७ फेब्रुवारी रोजी रसायनशास्त्राचा पेपर घेण्यात आला. परंतु शाळेकडून कडक सूचना देण्यात आल्या होत्या की जर मुलगी हिजाब घालून आली तर तिला पुढील परीक्षेत बसू दिले जाणार नाही. पुढचा पेपर गणिताचा आहे जो ८ मार्च रोजी होणार आहे
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.