
हेमंत चापुडे, झी मिडीया शिरूर पुणे : पुण्यातील शिरूर तालुक्यातील तीन जीवलग मित्र एकाच वेळे न्यायाधीश झाले आहेत. त्यांनी हे यश पहिल्यांदाच अनुभवलं असं नाही. या अगोदरही तिघांनी एकत्र अभ्यास केला. एकत्र वकिली केली आणि आता स्पर्धा परिक्षेत उत्तिर्ण होत तिघेही एकाच वेळी न्यायाधिश झाले आहेत.
ही दोस्ती तुटायची नाय…! मैत्री, मेहनत आणि यश यांचे महत्त्व अधोरेखित करणा-या शिरूर तालुक्यातील तीन मित्रांची न्यायाधीश पदापर्यंतची दोस्तीच्या दुनियादारीची यशोगाथा सध्या चर्चेचा विषय आहे.
पुण्याच्या शिरूर तालुक्यातून एक प्रेरणादायी आणि मैत्रीला नवा आयाम देणारी यशोगाथा समोर आली आहे. शिक्रापूरच्या शुभम कराळे, बुरुंजवाडीच्या सागर नळकांडे आणि कारेगावच्या अक्षय ताठे या तीन जिगरी मित्रांनी एकत्र अभ्यास करून MPSC च्या परीक्षेत यश मिळवत प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पद मिळवले आहे. त्यांच्या या यशाने संपूर्ण तालुक्याचे नाव उंचावले आहे
शिरूर तालुक्यातील वेगवेगळ्या गावांतील हे तीन मित्र, शुभम, सागर आणि अक्षय, यांनी एकत्र येऊन आपले ध्येय ठरवले. सुरुवातीला वकिलीची पदवी घेतल्यानंतर, त्यांनी स्पर्धा परीक्षेच्या वाटेवर एकत्र मार्गक्रमण केले. एकमेकांच्या अभ्यासाला मदत करत, प्रचंड मेहनत घेत त्यांनी MPSC च्या परीक्षेत उज्वल यश संपादन केले आणि आता तीनही मित्र प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी म्हणून न्यायदानाची जबाबदारी सांभाळणार आहेत.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.