digital products downloads

ही माझी बायको? अंबरनाथमध्ये दिवसाढवळ्या हायव्हॉल्टेज ड्रामा, रस्त्यातच दोन्ही पती…

ही माझी बायको? अंबरनाथमध्ये दिवसाढवळ्या हायव्हॉल्टेज ड्रामा, रस्त्यातच दोन्ही पती…

Ambarnath Crime News: गेल्या काही दिवसांपासून क्षुल्लक गोष्टींवरून घराघरात वाद घडताना दिसत आहेत. अंबरनाथमध्ये तर एक अजबच प्रकार उघडकीस आला आहे. अंबरनाथच्या गजबजलेला परिसर असलेला शिवमंदीर येथे मोठा राडा घडला. पत्नी नेमकी कोणाची? या वादातून दोन तरुणांमध्ये हाणामारी झाली. हा वाद इतक्या टोकाला गेला की एकाने महिला व तिच्या पतीवर थेट कोयत्याने वार केले. या घटनेने परिसरात मोठा गोंधळ घडला. 

पत्नी नेमकी कुणाची? या वादातून पहिल्या पतीने आपल्या सोडून गेलेल्या पत्नीसह तिच्या दुसऱ्या पतीवर कोयत्याने वार केल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. यामध्ये हे दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर मुंबईच्या फोर्टीस रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

अंबरनाथ पश्चिमेला राहणारे वसुधा लोखंडे आणि तिचे पती समीर लोखंडे (बदललेली नावं) हे शुक्रवारी 27 जून रोजी रात्री अंबरनाथ पूर्वेच्या शिवमंदिर रोडवरील एका ज्वेलर्समध्ये दागिने खरेदी करण्यासाठी आले होते. यावेळी वसुदेचा पहिला पती हा रिक्षा घेऊन तिथे आला आणि त्याने तिच्यावर धारदार कोयत्याने हल्ला चढवला. यात तिच्या दोन्ही हातावर आणि गुडघ्यावर वार करून तिच्या पहिल्या पतीने तिला गंभीर जखमी केलं. यावेळी तिला वाचवण्यासाठी तिचा दुसरा पती समीर लोखंडे हा मध्ये पडला असता त्याच्याही हातावर पहिल्या पतीने कोयताने वार केले. या हल्ल्यात जखमी झालेल्या वसुधा आणि समीर यांनी सुरुवातीला जवळच्या हॉस्पिटल आणि तिथून संजीवनी हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी धाव घेतली. मात्र तिथे प्राथमिक उपचार करून त्यांना मुलुंडच्या फोर्टिस हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारांसाठी त्यांना मुंबईच्या फोर्टीस हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. 

दरम्यान, या घटनेनंतर आरोपी हा स्वतःहून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांना शरण आला. याप्रकरणी त्याच्या विरोधात गंभीर हत्याराने दुखापत करणे, यासह भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली आहे.

वर्ध्यात शेतीच्या वादातून दोघांची हत्या तर एकाची आत्महत्या

वर्ध्यात शेतीच्या वादातून दोघांची हत्या. काकू आणि चुलत भावाची केली कुऱ्हाडीने हत्या. तर आरोपीने स्वतः विष पिऊन केली आत्महत्या. घटनेने परिसरात खळबळ

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp