
Sanjay Raut in Congress : संजय राऊतांनी ‘सामना’मधून पुन्हा एकदा काँग्रेसवर निशाणा साधलाय. काँग्रेसच्या अधिवेशनातील भूमिकेवरुन सामनातून कानपिचक्या देण्यात आल्यात. दरम्यान यानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी देखील राऊतांवर पलटवार केलाय.
काँग्रेसनं राष्ट्रीय अधिवेशनात घेतलेल्या भूमिकेवरुन सामनातून काँग्रेसवर निशाणा साधण्यात आलाय. सत्ताधाऱ्यांनी इंडिया आघाडीवर केलेल्या टीकेला काँग्रेसनं उत्तर द्यायला हवं होतं, तसंच विधानसभेत झालेल्या पराभवाचं खापरही सामनातून काँग्रेसवर फोडण्यात आलंय. (Sanjay Raut once again targets Congress through Saamana Maharashtra Politics News in Marathi)
गुजरातच्या भूमीवरून काँग्रेस! काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन मोदी-शहांच्या गुजरातमध्ये संपन्न झाले. लोकसभेच्या निकालानंतर ‘इंडिया आघाडी कोठे आहे?’ असे प्रश्न विचारले जातात. त्या प्रश्नांना काँग्रेसने गुजरातच्या अधिवेशनातून उत्तर देणे गरजेचे होते. इंडिया आघाडीचे काय झाले? ती जमिनीत गडप झाली की हवेत विरून गेली? नक्की काय झाले? याचे उत्तर देण्याची जबाबदारी काँग्रेस अध्यक्षांवर आहे.
विधानसभेत मोठे अपयश पदरी पडले. त्यास भाजपचे घोटाळे जितके कारणीभूत आहेत तेवढेच काँग्रेसअंतर्गत काही विषय जबाबदार आहेत. त्यावर मंथन झाले पाहिजे. काँग्रेसचं राष्ट्रीय अधिवेशन गुजरातमध्ये पार पडलं. दरम्यान या अधिवेशनातून काँग्रेसनं सत्ताधाऱ्यांवर शरसंधान साधलं. मात्र, हुकूमशाहीसोबत लढण्यासाठी काँग्रेसनं अजून पुढाकार घेणं गरजेचं असल्याचं संजय राऊतांनी म्हटलं. तर राऊतांच्या सल्ल्यावर वडेट्टीवारांनी देखील पलटवार केलाय.
सामनातून करण्यात आलेल्या टीकेनंतर सत्ताधाऱ्यांना काँग्रेसवर टीका करण्याचं आयतं कोलितच मिळालं. काँग्रेस कुठेच उरली नसून ठाकरेंच्या शिवसेनेलाही एकला चलोची भूमिका घ्यावी लागणार असल्याचा टोला शिरसाटांनी लगावला.
विधानसभेतील अपयाशानंतर मविआत फूट पडल्याची चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरुय. संजय राऊतांनी विधानसभेतेनंतर अनेकदा काँग्रेसच्या भूमिकेवरुन टीका केलीय. दरम्यान पुन्हा एकदा काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनातील भूमिकेवरुन सामनातून सवाल उपस्थित करण्यात आले आहेत.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.