digital products downloads

‘हृदयाचा ठोका चुकला…’ हेलिकॉप्टर बिघडल्यानंतर पंकजा मुंडेंचं विधान, आईने फोन करुन…

‘हृदयाचा ठोका चुकला…’ हेलिकॉप्टर बिघडल्यानंतर पंकजा मुंडेंचं विधान, आईने फोन करुन…

अजित पवार यांच्या विमान अपघातात निधन झाल्यानंतर, महाराष्ट्रातील इतर राजकारणीही विमानाने प्रवास करताना काळजी घेत आहेत. नुकतंच भाजप नेत्या आणि कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांच्याशी संबंधित आहे. मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला, ज्यामुळे त्यांना त्यांचा प्रवास तात्पुरता पुढे ढकलण्यात आला. नंतर, त्या दुसऱ्या हेलिकॉप्टरने बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे उघड झाले.

Add Zee News as a Preferred Source

सभेत काय म्हणाल्या पंकजा मुंडे? 

मी गोपीनाथ मुंडे यांची लेक आहे, कशालाच घाबरत नाही…हेलिकॉप्टर बिघडलं आणि अर्ध्या लोकांच्या हृदयाचा ठोका चुकला… हेलिकॉप्टर बिघाडानंतरही न डगमगता पंकजा मुंडे सभेला पोहोचल्या.  आज माझं हेलिकॉप्टर बिघडलं आणि अर्ध्या लोकांच्या हृदयाचा ठोका चुकला. लोक फोन करून म्हणत होते दौरा रद्द करा. आई म्हणत होती सभेला जाऊ नकोस. पण मी गोपीनाथ मुंडे यांची लेक आहे. मी कशालाच घाबरत नसल्याचं मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगीतले आहे. मंत्री पंकजा मुंडे या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत.

(हे पण वाचा – तो क्षण… जेव्हा सुनेत्रा पवारांना कळली अजित पवारांच्या निधनाची बातमी, व्हिडीओ कॉलवर पाहिलं…)

हेलिकॉप्टरमध्ये बिघाड अन्…

ते जुन हेलिकॉप्टर होतं , हेलिकॉप्टर बिघडलं असं मला सकाळी समजलं, कालच प्रथम दर्शनी मला हेलिकॉप्टरमध्ये बसल्या बसल्या हेलिकॉप्टर बिघाड  असल्यासारखं वाटलं. नेमकं काय बिघाड झाला हे मलाही माहित नाही. नेमकं मी सकाळी लातूरला निघाली त्यावेळेस ते बिघडलं अस  मला कळवण्यात आलं की ते हेलिकॉप्टर उडणार नाही दुसऱ्या हेलिकॉप्टरची व्यवस्था करावी लागेल. त्यालाही यायला वेळ झाला अन्यथा मी बाय कार आले असते, आता सभा आटपून पुढच्या सभेला जात आहेत.

विमान अपघातात अजित पवारांचं निधन 

अलिकडेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे विमान बारामती येथे कोसळले. या अपघातात अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला. तेव्हापासून सर्व राजकीय नेते विमानाने प्रवास करण्यापूर्वी खबरदारी घेत आहेत. अजित पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते आणि सकाळी बारामती येथील सभेला संबोधित करण्यासाठी मुंबईहून निघाले होते. अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

अजित पवार यांच्यापूर्वी गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचेही एअर इंडियाच्या विमान अपघातात निधन झाले. हा अपघात 12 जून 2025 रोजी अहमदाबादहून उड्डाण घेतल्यानंतर लगेचच झाला. या अपघातात एअर इंडियाचे फ्लाइट 171 पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. यापूर्वी, भारताचे पहिले संरक्षण प्रमुख जनरल बिपिन रावत यांचे 2021 मध्ये तामिळनाडूतील कुन्नूर येथे Mi-17V5 हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले. हे उल्लेखनीय आहे की विमान अपघातात विमानातील लोक वाचण्याची शक्यता खूपच कमी आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp