
What Is Hyderabad Gazette And Satara Gazette: मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण द्यावं या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मुंबईतील आझाद मैदान येथे आमरण उपोषणावर बसले आहेत. जरांगेंच्या आंदोलनाचा आज पाचवा दिवस असून त्यांच्यासोबत जवळपास 60 हजार मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत. आंदोलकांशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटलांनी अनेकदा हैद्राबाद गॅझेटचा उल्लेख केल्याचं दिसून येत आहे. मात्र मराठा आरक्षणाशी या हैदराबाद गॅझेटशी काय संबंध? हैदराबाद गॅझेटीयरमध्ये नेमकं आहे का? सातारा गॅझेटशी संबंधित मराठा आरक्षणाचा मुद्दा काय आहे? जाणून घेऊयात…
गॅझेटबद्दल काय म्हणाले जरांगे?
मनोज जरांगे पाटील यांनी समर्थकांशी संवाद साधताना, “सरकारने व फडणवीस यांनी कितीही अन्याय करायचा प्रयत्न केला तरी हैद्राबाद व सातारा गॅझेटची अंमलबजावणी झाल्याशिवाय मुंबई सोडत नाही,” असं म्हटलं आहे. मात्र सातारा आणि हैदराबाद गॅझेट आहे तरी काय? त्याचा या आरक्षणाशी काय संबंध आहे हे अनेक मराठ्यांनाही ठाऊक नाही. त्यावरच नजर टाकूयात…
सातारा गॅझेट म्हणजे काय आहे?
सातारा गॅझेट हा सातारा जिल्ह्याशी संबंधित सरकारी अधिसूचना, नियम, आदेश आणि माहिती प्रकाशित करणारा अधिकृत दस्तऐवज आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील जमीन व्यवहार, शासकीय योजना, निवडणूक अधिसूचना, आणि इतर कायदेशीर बाबींची माहिती नोंदवली जाते. गॅझेट हे शासनाचे अधिकृत राजपत्र असते, जे स्थानिक स्तरावर जिल्ह्याच्या प्रशासकीय आणि कायदेशीर कामकाजासाठी वापरले जाते.
सातारा गॅझेटशी संबंधित मराठा आरक्षणाचा मुद्दा काय आहे?
मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याच्या मागणीवरून वाद आहे. सातारा जिल्ह्यातील काही मराठा समाजाच्या नोंदी कुणबी म्हणून सातारा गॅझेटमध्ये असू शकतात, ज्याचा उपयोग आरक्षणासाठी पुरावा म्हणून केला जातो. मात्र सुप्रीम कोर्ट आणि मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आणि कुणबी यांना दोन वेगळ्या जाती मानल्या असून, सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास नकार दिला आहे.
काय आहे हैदराबाद गॅझेटीयरमध्ये?
– 1901 साली झालेल्या मराठवाड्यातील जनगणनेची प्रत 1901 साली प्रकाशित झाली.
– या प्रती नुसार त्याकाळी मराठवाड्यात 36 टक्के मराठा कुणबी होते.
– मराठा व कुणबी एकच असल्याचा दावा या प्रतीमध्ये उल्लेख आढळतो.
– उत्तराखंड राज्यातील लाल बहादूर शास्त्री प्रशासन अकादमी मध्ये ही प्रत उपलब्ध आहे.
– या प्रतीमध्ये जिल्हानिहाय कुणबी मराठा लोकसंख्या नमूद केलेली आहे.
सातारा गॅझेट आणि हैदराबाद गॅझेट यांच्यात काय फरक आहे?
सातारा जिल्ह्याच्या स्थानिक प्रशासकीय आणि कायदेशीर बाबींसाठी सातारा गॅझेट प्रकाशित होते. सातारा गॅझेटमध्ये सातारा जिल्ह्याशी संबंधित नोंदी असतात. हैदराबाद गॅझेट हा निझाम काळातील (1918 मधील) अध्यादेश असून, मराठवाडा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, आणि कर्नाटकातील काही भागांशी संबंधित आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भात मराठा-कुणबी नोंदींसाठी याचा उल्लेख अनेकदा होतो.
आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी या गॅझेट मागणीवर सरकारचं म्हणणं काय?
मराठा आरक्षणासंदर्भात सरकार नवीन शासन आदेश म्हणजेच जीआर काढण्याच्या तयारीत आहे. या जीआरमध्ये सरकार, कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी गावातील नातेवाईक किंवा कुणबी प्रमाणपत्रधारक यांच्या ॲफिडेव्हिटवर आरक्षण लागू करण्यासंदर्भात विचार करत आहे. कुणबी नोंदी पडताळणीसाठी तालुका आणि ग्रामपंचायत स्तरावर नवीन स्क्रुटिनी कमिटी स्थापन करून गाव पातळीवर नोंदी शोधण्याचा निर्णय केला जाण्याची तयारी केली जात असल्याची चर्चा आहे. मात्र त्याचवेळी हैदराबाद गॅझेटीयर जसंच्या तसं लागू करता येणार नाही. कारण गॅझेटीयरमध्ये केवळ आकडे (लोकसंख्या) आहेत. त्यात स्पष्टता नाही. ते तसंच्या तसं लागू केलं जाऊ शकत नाही अशी सरकारी पातळीवर चर्चा आहे. अशातच हे मध्य मार्ग काढत तात्काळ मराठा बांधवांना दिलासा देण्याचा सरकारचा प्रयत्न असेल. आता मनोज जरांगे हा सरकारचा प्रस्ताव मान्य करतात का? हे बघणं महत्त्वाचं असेल.
FAQ
सातारा गॅझेट म्हणजे काय?
सातारा गॅझेट हा सातारा जिल्ह्याशी संबंधित सरकारी अधिसूचना, नियम, आदेश आणि माहिती प्रकाशित करणारा अधिकृत दस्तऐवज आहे. यामध्ये जमीन व्यवहार, शासकीय योजना, निवडणूक अधिसूचना, आणि इतर कायदेशीर बाबींची नोंद असते. हे शासनाचे अधिकृत राजपत्र आहे, जे जिल्हास्तरीय प्रशासकीय आणि कायदेशीर कामकाजासाठी वापरले जाते.
हैदराबाद गॅझेट म्हणजे काय?
हैदराबाद गॅझेट हा निझाम काळातील (1918 मधील) अधिकृत दस्तऐवज आहे, ज्यामध्ये मराठवाडा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकातील काही भागांशी संबंधित नोंदी आहेत. 1901 च्या मराठवाड्यातील जनगणनेनुसार, मराठा आणि कुणबी एकच असल्याचा दावा या गॅझेटमध्ये आहे, आणि त्यावेळी मराठवाड्यात 36% मराठा-कुणबी लोकसंख्या होती. हा दस्तऐवज उत्तराखंडमधील लाल बहादूर शास्त्री प्रशासन अकादमीमध्ये उपलब्ध आहे.
मराठा आरक्षणाशी सातारा आणि हैदराबाद गॅझेटचा काय संबंध आहे?
सातारा गॅझेट: सातारा जिल्ह्यातील काही मराठा समाजाच्या नोंदी कुणबी म्हणून असू शकतात, ज्याचा उपयोग मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळवण्यासाठी पुरावा म्हणून केला जातो.
हैदराबाद गॅझेट: 1918 मध्ये निझाम सरकारने मराठा समाजाला “हिंदू मराठा” म्हणून नोंदवून शैक्षणिक आणि नोकरीत आरक्षण दिले होते. यामुळे मराठा आणि कुणबी एकच असल्याचा दावा केला जातो, आणि हा दस्तऐवज मराठा आरक्षणासाठी ऐतिहासिक पुरावा म्हणून वापरला जातो.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.