
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अनिल परब यांनी शुक्रवारी विधानपरिषदेत राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावाने असणाऱ्या बारमध्ये 22 बारबालांना त्यांच्या गिऱ्हाईकासह पकडण्यात आल्याचा आरोप केला होता. या आरोपांमुळे एकच खळबळ मा
.
रामदास कदम आज एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले की, अनिल परब हे अर्धवट वकील आहेत. उद्धव ठाकरे अशा अर्धवट वकिलांचा सल्ला घेऊन चालतात, त्यामुळे त्यांची ही गत झाली आहे. अनिल परब यांनी उल्लेख केलेला सावली बार माझी पत्नी ज्योती कदम यांच्या नावाने आहे. पण तो सध्या शेट्टी नामक इसम चालवतो. तिथे एक प्रसंग घडला. तिथे त्या इसमाने एका मुलीवर पैसे उधळले. त्यानंतर मी सर्व लायसन्स पोलिसांकडे जमा केले. हा आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. या प्रकरणी अनिल परब यांच्याविरधात अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
शेट्टी नामक व्यक्तीस हॉटेल चालवण्यास दिले
रामदास कदम या प्रकरणी अधिक स्पष्टीकरण देत म्हणाले, शेट्टी नामक इसम मागील 30 वर्षांपासून आमचा सावली बार चालवत आहे. हे वास्तव आहे. माझ्या पत्नीच्या नावे लायसन्स आहे, पण ते ऑर्केस्ट्राचे आहे. मुलींचे, वेटरचे लायसन्स आहे. ते अनधिकृत नाही. तिथे डान्स चालत नाही. पण मला एक गोष्ट कळली ती अशी की, एका कस्टमरने एका मुलीवर पैसे उधळले. ही गोष्ट समजल्यानंतर मी तत्काळ ऑर्केस्ट्राचे लायसन्स, त्या मुलींचे लायसन्स पोलिसांकडे सबमिट केले. ते हॉटेल बंद करून टाकले. अशा घाणेरड्या पैशांची आम्हाला गरज नाही.
आम्ही सक्षम आहोत. देवाने आम्हाला सर्वकाही दिले आहे. पण आमच्यावर बेछुट आरोप करण्यात आले. मला वाटते आरोप करणाऱ्या अर्धवट वकिलांना अद्याप कायद्याची माहिती नाही. बार एखाद्या व्यक्तीला चालवण्यासाठी दिला असेल, तर तिथे घडणाऱ्या घटनांसाठी तोच व्यक्ती जबाबदार असतो असे कायद्यात नमूद आहे. पण परब यांना हे ठावूक नाही. ते अर्धवट माहिती घेतात आणि बोलतात.
योगेश कदम यांना संपवण्याचा प्रयत्न
या लोकांनी यापूर्वी माझा मुलगा योगेश कदम याला राजकीय पद्धतीने संपवण्याचा प्रयत्न केला. आता जर कुणी विधिमंडळात चुकीची माहिती देऊन आमची बदनामी करत असेल, तर मी पत्राद्वारे अध्यक्षांकडे तक्रार दाखल करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करेल. त्यांचे स्वप्न केव्हाच पूर्ण होणार नाही. आम्ही चुकीचे काही करणार नाही, असेही रामदास कदम यावेळी बोलताना म्हणाले.
काय म्हणाले होते अनिल परब?
अनिल परब यांनी शुक्रवारी विधानपरिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना गृह राज्यमंत्र्यांच्या आईच्या नावे डान्सबार असल्याचा आरोप केला होता. ते म्हणाले होते, मुंबईच्या कांदिवाली भागात सावली बार आहे. तिथे पोलिसांनी धाड टाकली. त्यावेळी 22 बारबाला पकडल्या गेल्या. या कारवाईत 22 बारबालांसह 22 कस्टमर व 4 कर्मचाऱ्यांना पकडण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणी पंचनामा दाखल करून आढळलेल्या ग्राहकांवर गुन्हा दाखल केला. गंभीर गोष्ट म्हणजे या बारचे परमिट ज्योती रामदास कदम यांच्या नावे आहे. या महिला गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या मातोश्री आहेत. राज्यात डान्सबारवर बंदी असताना हा बार सुरू कसा?
आया-बहिणींना डान्सबारमध्ये नाचवता?
एकीकडे तुम्ही लाडक्या बहिणींचा आपल्याला आशीर्वाद असल्याचा दावा करता आणि दुसरीकडे आया-बहिणींना डान्सबारमध्ये नाचवता? सरकारने आजच्या आजच गृह राज्यमंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. अजितदादा तुम्ही योग्य ती कारवाई कराल. पण जे मुख्यमंत्री आज कारभार सांभाळत आहेत, त्यांनी गृह राज्यमंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. या प्रकरणी कारवाई झाली नाही तर सरकारचा या कृतीला पाठिंबा असल्याचे सिद्ध होईल. सध्या आपली मान शरमेने खाली जात आहे. आज बिहारमध्ये महाराष्ट्राचा बिहार झाला का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. गृह राज्यमंत्र्यांकडूनच कायदा पायदळी तुडवला जात असेल तर हा मुख्यमंत्र्यांच्या कर्तव्य परायणतेवर प्रश्नचिन्ह आहे, असेही अनिल परब चा प्रकरणी म्हणाले होते.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.