
Class 10th student earning with AI: देशासह जगभरात आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआय वेगाने वाढतोय. लहान मुलांपासून व्यावसायिकांपर्यंत सर्वजण एआयचा वापर करु लागले आहेत. दुसरीकडे एआयच्या वाढत्या वापरामुळे नोकरदार वर्गात भीतीचे वातावरण आहे. एआयमुळे लाखो नोकऱ्यांवर टांगती तलवार असल्याचे म्हटले जात आहे. पण या सर्वाची पर्वा न करता दहावीच्या एका विद्यार्थ्याने एआयला कामाला लावून 2 महिन्यात 1.5 लाख रुपयांहून जादा कमाई केलीय. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Reddit वर एक पोस्ट व्हायरल होतेय. ज्यामध्ये याबद्दल सांगण्यात आलंय.
दहावी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने एआयच्या मदतीने वेबसाइट बनवून विकली आणि अवघ्या 2 महिन्यात 1.5 लाख रुपयांहून जास्त कमाई केली. रेडीटच्या पोस्टमध्ये यासंदर्भात दावा करण्यात आलाय. एआय इनोव्हेशनवर काम करत असलेल्या रेडीट अकॅडेमिक वॉइस 6526 यूजरने विद्यार्थ्याची कहाणी शेअर केली आहे. जी खूप व्हायरल होतेय.
व्हायरल पोस्टमध्ये काय म्हटलंय?
‘इंडिया इज नॉट बिगिनर्स’ ही ओळ आपण ऐकली असेल. पण मी काल ही अनुभवली. एआय नोकऱ्यांवर मोठ्या प्रमाणात ताबा घेतोय. खूप लोकं भविष्यात बेरोजगार होण्याच्या भीतीत आहेत. मीदेखील याबाबत विचार करत होतो. एआय प्लॅटफॉर्म वापरायला लागल्यापासून हा विचार जास्त येऊ लागला. लोकं आमच्या एआय वेबसाइट बिल्डरचा उपयोग कसा करतात, हे काल मी यूजर एनालिटिक्सवर तपासत होतो.’
पोस्टमध्ये पुढे म्हटलंय, एक यूजर होता. ज्याचे यूजरनेम मस्त असे होते. तो याचा वापर नियमित करत होता. क्रेडीट खरेदी करत होता. रोज वेबसाइट बनवत होता. मला उत्सुकता वाटली आणि मी त्याची प्रोफाइल तपासली तर तो एक दहावीचा विद्यार्थी होता.’
एआय वेबसाइट बिल्डर प्लॅटफॉर्मचे फाऊंडर आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हणतात, ‘स्टुडंट्स लोकल कम्युनिटी, रेडीट, सोशल मीडिया प्लॅटफर्म आणि स्कूल कनेक्शनच्या माध्यमातून छोट्या छोट्या व्यवसायासाठी एक पेजर वेबसाइट बनवत होता. तो कोडर नव्हता तरीही त्याने 2 महिन्यात 8 वेबसाइट्स बनवून त्याने विकल्या होत्या. एक वेबसाइट विकून त्याने साधारण 250-300 डॉलर म्हणजेच 1.5 लाखहून जास्त रुपये कमावले.’
एआयमुळे जगभरातील 9.2 कोटी नोकऱ्या धोक्यात असल्याचे वर्ल्ड इकोनॉमिक फोरमच्या ‘फ्यूचर ऑफ जॉब्स रिपोर्ट 2025’ मध्ये म्हटलंय. 2030 पर्यंत कोट्यवधी नोकऱ्या समाप्त होतील. सोबतच 17 कोटी नव्या नोकऱ्या तयार होतील. तांत्रिक विकास, हरित बदल, आर्थिक आणि डेमोग्राफीक बदलामुळे हे स्थित्यंतर येईल. एआयचा वापर वेगाने वाढतोय.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.