
Realme P4 Power 5G: शाओमीच्या सब-ब्रँड रेडमीने भारतात नोट 15 प्रो आणि नोट 15 प्रो+ हे दोन नवे स्मार्टफोन बाजारात आणले आहेत. हे फोन मध्यम श्रेणीतील प्रीमियम विभागात येतात आणि त्यात 200 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा आणि मोठी बॅटरी आहे. फोटोग्राफी आणि लॉंग टर्म टिकणाऱ्या बॅटरीसाठी खास तयार करण्यात आले आहेत. याची प्री-बुकिंग सुरू झाले असून विक्री 4 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या फोनबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
शाओमी कंपनीने हे फोन महाग फीचर्स कमी किंमतीत देण्यासाठी डिझाइन केले आहेत. ज्यामुळे सामान्य ग्राहकांना उत्तम पर्याय मिळणार आहे. ही सिरीज आधीच्या नोट 15 नंतर आली असून त्यात 108 मेगापिक्सेल कॅमेरा होता पण ही नवीन मॉडेल्स अधिक सुधारित आहेत.
काय आहे ऑफर्स?
रेडमी नोट 15 प्रो+ च्या बेस व्हेरिएंटची किंमत 37999 रुपये आहे (8 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज), तर 12 जीबी रॅम + 256 जीबीसाठी 39999 रुपये आणि 12 जीबी रॅम + 512 जीबीसाठी 43999 रुपये आहेत. रेडमी नोट 15 प्रोची किंमत 29,९९९ रुपये (८ जीबी रॅम + १२८ जीबी) आणि ३१,९९९ रुपये (८ जीबी रॅम + 256 जीबी) आहे. दोन्ही मॉडेल्सवर बँक डिस्काउंटद्वारे 3000 रुपयांपर्यंत सूट मिळेल. हे फोन कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि अॅमेझॉनवर उपलब्ध आहेत. ही किंमत मध्यम बजेट असलेल्या लोकांसाठी योग्य आहे.
डिस्प्ले आणि प्रोसेसर
दोन्ही फोनमध्ये 6.83 इंचाचा एमोलेड डिस्प्ले आहे. ज्यात 120 हर्ट्झ रिफ्रेश रेट मिळतो. ज्यामुळे स्क्रीन खूप स्मूथ आणि स्पष्ट दिसते. प्रो मॉडेलमध्ये गोरिला ग्लास विक्टस 2 चे संरक्षण आहे. ज्यामुळे स्क्रॅच आणि पडण्यापासून मोबाईल वाचतो. प्रोसेसरबाबत, नोट 15 प्रो+ मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 7एस जनरेशन 4 आहे, तर नोट 15 प्रोमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी 7400-अल्ट्रा आहे. हे प्रोसेसर गेमिंग, मल्टिटास्किंग आणि दैनंदिन कामांसाठी शक्तिशाली आहेत. फोन 5जी सपोर्ट करतात आणि मध्यम श्रेणीत उत्तम परफॉर्मन्स देतात.
कॅमेरा आणि बॅटरीची खासियत
दोन्ही फोनमध्ये दुहेरी रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यात 200 मेगापिक्सेलचा प्रायमरी लेन्स आणि 8 मेगापिक्सेलचा सेकंडरी लेन्स (प्रोमध्ये अल्ट्रा-वाइड) आहे. सेल्फीसाठी प्रो+ मध्ये 32 मेगापिक्सेल आणि प्रोमध्ये 20 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. हे कॅमेरे उत्तम फोटो आणि व्हिडिओ घेण्यासाठी उपयुक्त आहेत. बॅटरीबाबत, प्रो+ मध्ये 6500 एमएएच बॅटरी 100 वॅट फास्ट चार्जिंगसह आहे, तर प्रोमध्ये 6580 एमएएच बॅटरी 45 वॅट चार्जिंगसह आहे. हे फीचर्स दीर्घकाळ वापर आणि जलद चार्जिंग देतात.
फोनची बुकींग
फोनची प्री-बुकिंग आता सुरू असून 4 फेब्रुवारीपासून विक्री सुरू होईल. कंपनीच्या साइट आणि अॅमेझॉनवरुन हा फोन तुम्हाला विकत घेता येणार आहे. ही सिरीज मध्यम किंमतीत प्रीमियम फीचर्स देत असल्याने बाजारात स्पर्धा वाढणार आहे. फोटोग्राफी आणि बॅटरीवर लक्ष केंद्रित करून हा फोन तयार करण्यात आलाय. ज्यामुळे तरुण आणि प्रोफेशनल्ससाठी हा बेस्ट पर्याय आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



