digital products downloads

12 जिल्हा परिषदा निवडणुकांचा महासंग्राम; महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांमध्ये हायव्होल्टेज सामना, अस्तित्वाची लढाई

12 जिल्हा परिषदा निवडणुकांचा महासंग्राम; महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांमध्ये हायव्होल्टेज सामना, अस्तित्वाची लढाई

Maharashtra ZP Election 2026 :  राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांची मतमोजणी उद्या होणार आहे. राज्यात सरासरी 70 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. पुणे,सातारा, सांगली, सोलापूर कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यात मतदान प्रक्रिया पार पडली. जिल्ह्यांतील मातब्बर नेत्यांची प्रतिष्ठा या निवडणुकीमध्ये पणाला लागलेली आहे. त्यामुळे कोणाच्या गळ्यात विजयाची माळ पडणार याची उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे. 
अजित पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे राज्यावर शोककळा पसरली. त्याचं सावट जिल्हा परिषद आणि पंचयात समितीच्या निवडणुकीवर दिसून आलं होतं. या पार्श्वभूमीवर उद्याच्या निकालाकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. 

Add Zee News as a Preferred Source

1.रायगड 

राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले आमदार महेंद्र दळवी यांची  तर भाजप जिल्हाध्यक्ष खासदार धैर्यशील पाटील यांची  प्रतिष्ठा पणाला.

2 रत्नागिरी  

उदय सामंत, भास्कर जाधव मंत्री योगेश कदम, शेखर निकम यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय

3 सिंधुदुर्ग  

सिंधुदुर्गात महायुती म्हणुन भाजपा आणि शिवसेना एकत्र लढले असले तरी आमदार निलेश राणे आणि आमदार दिपक केसरकर यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय 
तर दुसरीकडे मंत्री नितेश राणे यांनी निकालापूर्वीच आपला करिष्मा दाखवत 25 जागा बिनविरोध केल्यात 
तर सिंधुदुर्गात उबाठाचे माजी आमदार वैभव नाईक यांच्यासाठी हि अस्तित्वाची लढाई असून त्यांची देखील प्रतिष्ठा पणाला लागलीय

4 पुणे  

भोरचे माझी आमदार संग्राम थोपटे यांच्या पत्नी स्वरूपा या उझोली- कारी
गावातून भाजपकडून मैदानात उतरल्या आहेत. त्यांचा सामना जिल्हा परिषदेखे
माझी उपाध्यक्ष रणजित शिवतरे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराशी आहे.
 शिरवळचे माझी आमदार अशोक पवार यांची पत्नी व जिल्हा परिषदेच्या माजी सभापती सुजाता पवार या राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवत आहेत.
जुन्नर तालुक्यातील बोरी- खोडे येथून राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आणि
जिल्हा परिषदेचे माझी उपाध्यक्ष पांडुरंग पवार यांच्या सुनबाई कविता पवार यांनीअपक्ष उमेदवारी कायम ठेवत पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला आणलं आहे.
आंबेगावात जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे–पाटील आणि अरुण गिर यांच्या अडचणी वाढल्या आहेत कारण या ठिकाणी शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी (शरद पवार) एकत्र लढत आहेत. तर दोन्ही राष्ट्रवादी एकमेकांसमोर उभ्या आहेत.
 खेड तालुक्यात भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेल्या शरद बुट्टे पाटील यांची पत्नी सुजाता
बुट्टे पाटील यांच्या विराेधात आमदार बाबाजी काळे यांचा भाचा ठाकरेंच्या शिवसेनेकडून रिंगणात आहे.
 दौंड तालुक्यातील खडक्री येथून दिवंगत माजी आमदार कृष्णराव जगताप यांचे
पुत्र वीरेंद्र हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवत आहेत. तसेच बोरीभाडे
येथून माझी आमदार रामशेठ शिरोल यांच्या पुत्र ऋषभ यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली आहे.
इंदापूर तालुक्यात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मुलगी अंकीता पाटील या
दुसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. येथून त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार आहेत.
कुंभारगाव दत्तनगर भरवण इथुन मुलगा श्रेयस यालाही राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी मिळाली आहे.

5 सातारा 

सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतसार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, पर्यटन आणि साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई  आणि मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे

6 सांगली

सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील आजी-माजी आमदार-खासदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील,
काँग्रेस आमदार विश्वजीत कदम 
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पाटील
भाजपा आमदार गोपीचंद पडळकर
आमदार सदाभाऊ खोत
भाजपा आमदार सत्यजित देशमुख
शिवसेना शिंदे पक्ष आमदार सुहास बाबर 
राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे माजी खासदार संजयकाका पाटील 
खासदार विशाल पाटील 
काँग्रेसचे माजी आमदार विक्रम सावंत 
भाजपा आमदार सुरेश खाडे

7 सोलापूर 

अक्कलकोट –
भाजप आ. सचिन कल्याणशेट्टी विरुद्ध  माजी. मंत्री तथा शिंदेसेनेचे नेते सिद्धाराम म्हेत्रे
मोहोळ – 
भाजप नेते राजन पाटील विरुद्ध राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, शरद पवार गटाचे आ. राजू खरे 
बार्शी – 
भाजपचे माजी. आ. राजेंद्र राऊत विरुद्ध  ठाकरे सेनेचे आ. दिलीप सोपल 
दक्षिण सोलापूर – 
भाजप आ. सुभाष देशमुख  
उत्तर सोलापूर
माजी.आ. तथा भाजपचे दिलीप माने, भाजप नेते शहाजी पवार विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे जेष्ठ नेते काका साठे

8 कोल्हापूर 

मिनी विधानसभा अशी ओळख असणाऱ्या कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी जिल्ह्यातील अनेक नेत्यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, काँग्रेस नेते सतेज पाटील, जनसुराज्य पक्षाचे नेते विनय कोरे यांच्यासह उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शिवसेना नेते माजी खासदार संजय मंडलिक यांचा समावेश आहे.. जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता येवो यासाठी महायुती एक संघ लढेल अस सुरुवातीला वाटलं होतं, पण तब्बल 12 पैकी 10 तालुक्यात  महायुतीच्या पक्षामध्ये जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने रस्सीखेच पाहायला मिळाले आहे. त्यामुळे उद्या होणाऱ्या मतमोजणीत नेमकं काय होणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिल आहे…

9 छत्रपती संभाजीनगर  

सिल्लोड – अंभई गट
अमेर अब्दुल सत्तार (अब्दुल सत्तार यांचे पुत्र)
त्र्यंबक गव्हाणे (भाजप) अंभई गटात सत्ताधारी व भाजप यांच्यात थेट लढत.
पैठण – पाचोड गट
शिवराज भुमरे (खासदार संदीपान भुमरे यांचे पुतणे)
विलास शेळके (राष्ट्रवादी काँग्रेस) भुमरे घराण्याची ताकद विरुद्ध राष्ट्रवादीचे आव्हान.
कन्नड गट – नागद गट
पूनमबाई राजपूत (माजी आमदार उदयसिंग राजपूत यांच्या पत्नी – शिवसेना UBT)
चंद्रकलाबाई उत्तम राठोड – शिवसेना शिंदे
हातनूर गट
मीनाक्षी पवार (भाजप – आमदार बबनराव लोणीकर यांची कन्या) राजकीय घराण्यांमधील प्रतिष्ठेची लढत.
रंजना राठोड – ( UBT शिवसेना ) 
गणोरी गट
निखिल चव्हाण भाजप ( आमदार अनुराधा चव्हाण यांचे पुतणे) 
संदीप बोरसे (मविआ) भाजप विरुद्ध महाविकास आघाडी संघर्ष.
बिडकीन गट
विजय चव्हाण (भाजप)
मनोज पेरे (शिवसेना UBT) याच जागेवरून युतीत मतभेद झाले होते.
ढोरकिन गट
राधिका जगताप (शिंदे गट शिवसेना)
सुनीता वाघचौरे (राष्ट्रवादी काँग्रेस – माजी आमदार संजय वाघचौरे यांच्या पत्नी)

10 परभणी  

एकूण 54 जिल्हा परिषद गट 
108 पंचायत समिती गण 
कोणत्या नेत्याची प्रतिष्ठा पणाला 
राज्यमंत्री भाजपच्या मेघना बोर्डीकर यांची प्रतिष्ठा पणाला
उद्धव ठाकरे सेनेचे खा. संजय जाधव यांची प्रतिष्ठा पणाला
उद्धव ठाकरे सेनेचे परभणी चे आमदार राहुल पाटील आमदार यांची प्रतिष्ठा पणाला
माजी मंत्री भाजपचे सुरेश वरपूडरकर यांची प्रतिष्ठा पणाला

11 धाराशीव  

जिल्हा परिषद 55 तर पंचायत समिती 110 जागा.
तुळजापूरचे भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील जिल्हा परिषद गटातून निवडणूक रिंगणात.
भाजपकडून जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या प्रमुख दावेदार
सावंत कुटुंबात बंडखोरी.
माजी मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत अपक्ष उमेदवार.
भाजपाकडून धनंजय सावंत यांना पाठिंबा.
परिणामी तानाजी सावंत यांच्यासाठी प्रतिष्ठेची निवडणूक
शिवसेनेचा अध्यक्षपदाचा दावा
शिवसेनेचे माजी खासदार रवींद्र गायकवाड यांच्या पत्नी सौ उषाताई गायकवाड
जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात.
शिवसेनेकडून अध्यक्षपदाच्या दावेदार
 पंचायत समिती – सत्तासंघर्ष
काँग्रेसचे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू
तुळजापूर पंचायत समिती सदस्य.
सभापतीपदाचे दावेदार.
माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची मुलगी
उमरगा पंचायत समिती निवडणूक रिंगणात
उमरगा पंचायत समिती सभापतीपदाची दावेदार
 उद्धव ठाकरे गटाची कोंडी, खासदार उमराजे निंबाळकर यांची प्रतिष्ठा पनाला
धाराशिव जिल्हा
उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचा बालेकिल्ला मात्र मागील नगरपरिषद निवडणुकीत दारुण पराभव. एकाही नगरपरिषदेत नगराध्यक्ष नाही.
त्यामुळे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या साठी जिल्हा परिषद व पंचायत समिती  ची ही निवडणूक प्रतिष्ठेची नाही, तर अस्तित्वाची लढाई

12 लातूर 

लातूर जिल्ह्यातील अहमदपूर पंचायत समितीच्या निवडनुकीत सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचा मुलगा सुरज पाटील शिरूर गटातून निवडनुक लढवत आहेत. त्यामुळे तिथं सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
लातूरचे भाजपा माजी खासदार सुधाकर शृंगारे यांची मुलगी चाकुर तालुक्यातील रोहीणा जिल्हा परिषद गटातून सुप्रिया शृंगारे-पायाळ या निवडणुकीच्या रिंगणात आहे. तिथं भाजपा माजी खासदार सुधाकर शृंगारे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
उबाठा शिवसेना ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष सोमवंशी यांच्या पत्नी अरूना संतोष सोमवंशी या लोदगा गटातून जिल्हा परिषद निवडणूक लढवत आहेत त्यांच्या समोर भाजपा आमदार अभिमन्यू पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय पुनम संतोष मुक्ता या निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp