digital products downloads

123 कुटुंबांनी एकत्र येऊन विकसित केलेले महाराष्ट्रातील एकमेव शहर; पवारांच्या घरची सून या शहराच्या संस्थापकाची मुलगी

123 कुटुंबांनी एकत्र येऊन विकसित केलेले महाराष्ट्रातील एकमेव शहर; पवारांच्या घरची सून या शहराच्या संस्थापकाची मुलगी

Pune Magarpatta : पवार कुटुंबात लगीनघाई सुरू आहे. पवार घरात एकापाठोपाठ एक असे दोन लग्नाचे बार उडणार आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापाठोपाठ आता शरद पवारांचा नातू युगेंद्र पवारांचा साखरपुडा पार पडला आहे. युगेंद्र पवार हे अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांचे पुत्र आहे. पवारांच्या घरात सून म्हणून या येणाऱ्या या दोन्ही मुलींचे माहेर कुठले आहे याची सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे. अशातच चर्चेत आली आहे ती पवारांची एक सूनबाई.   महाराष्ट्रतील पुण्याजवळ एक असे शहर आहे जे 123  कुटुंबांनी एकत्र येऊन विकसित केले आहे. या टाऊनशिपच्या संस्थापकाची मुलगी पवारांच्या घरची सून आहे. जाणून घेऊया ही सासरवाडी नमेकी आहे तरी कुणाची. 

यापूर्वी १० एप्रिल रोजी जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचे पुण्यात साखरपुडा झाले होते. ऋतुजा ही फलटण (सातारा) येथे सोशल मीडिया कंपनी चालवणाऱ्या प्रवीण पाटील यांची मुलगी आहे. आता युगेंद्र पवारचा तनिष्कासोबत साखरपुडा झाला आहे. युगेंद्र पवार यांच्या भावी पत्नीचे संपूर्ण नाव तनिष्का प्रभू असे आहे. तनिष्का मुळची मुंबईची आहे. तनिष्काने परदेशात राहून फायनान्सचे शिक्षण पूर्ण केले आहे. जय आणि युगेंद्र पवार यांच्या पेक्षा आमदार रोहित पवार यांची सासरवाडी जास्त चर्चेत आहे. कारण, रोहित पवार यांची पत्नी ही एका टाऊनशिपच्या संस्थापकाची मुलगी आहे.   

रोहित पवार हे मगरपट्टा शहराचे जावई आहेत. मगरपट्टा हे 123  कुटुंबांनी एकत्र येऊन विकसित केलेले महाराष्ट्रतील एकमेव शहर आहे. हेच मगरपट्टा शहर रोहित पवार यांची ससारवाडी आहे.  सतीश मगर हे पुण्यातील मगरपट्टा सिटी या टाऊनशिपचे संस्थापक आहेत. रोहित पवार यांचे ते सासरे आहेत. सतीश मगर यांची  कन्या कुंती यांचा विवाह कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्याशी झालेला आहे. त्यामुळे सतीश मगर रोहित पवार यांचे सासरे आणि रोहित पवार हे मगरपट्टा सिटीचे जावई आहेत. 

महाराष्ट्र हे झपाट्याने विकसीत होत असलेले राज्य आहे. सरकारतर्फे अनेक शहरांचा विकास केला जात आहे. तर, चौथ्या मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यात नविन शहस विकसीत करण्याची योजना सरकारने आखली आहे.  पण, मगरपट्टा हे शहर सरकारने नाही तर 123  कुटुंबांनी एकत्र येऊन विकसित केलं आहे. महाराष्ट्रतील सर्वात लोकप्रिय जिल्ह्यात म्हणजेच पुण्यात हे शहर आहे.  15 ते 20 वर्षांपूर्वी मगरपट्टा शहराची निर्मिती करण्यात आली. पुण्यातील सर्वात श्रीमंत एरियांच्या यादीत मगरपट्टा परिसराचे नाव सर्वात टॉपला आहे. सन 2000 पासून या शहराचा झपाट्याने विकास झाला आहे. येथे 450 एकर जागा खाजगी मालकीची आहे.

असे निर्माण झाले मगरपट्टा शहर

मगरपट्टा सिटीला अनेक लोकं काही वर्षापूर्वी फॉरेन म्हणून ओळखत होते. तर सध्याच्या परिस्थिती हे खासगी विकसित शहर बनले आहे. मॉल, आयटी पार्क, बाजारपेठा, शाळा, दवाखाने अशा  सर्व सुविधा येथे आहेत. 2002 सालानंतर याचा झपाट्याने विकास झाला आणि येथे नव्या शहराचा उदय झाला.  मगरपट्टा या परिसरात मूळ ‘मगर’ आडनाव असलेल्या समुदायाच्या मालकीचे शेतांचे भूखंड होते. 1982 मध्ये मगरपट्टा परिसर क्षेत्र PMC द्वारे फ्युचर अर्बनिझेबल झोन म्हणून निश्‍चित केले गेले. यामुळे पुणे महापालिकेला विकासासाठी अगदी सहजपणे येथील जमीन ताब्यात घेता येत होत्या. मात्र, मगपट्टा परिसरातील 123 मगर कुटुंबांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. विकासासाठी आपली जमीन पालिकेच्या ताब्यात द्यायटी नाही भूमिका त्यांनी एकमताने घेतली.  123 मगर कुटुंबांनी एकत्र येऊन स्वत:च्या बळावर जमीन विकसित केली.  123 मगर कुटुंबांनी मगपट्टा नावाचे शहर वसवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी सर्वांनी मिळून एकत्र एक कंपनी स्थापन केली. या कंपनीच्या माध्यमातून मगरपट्टा शहर विकसीत करण्यात आले. प्रत्येक कुटुंबाला त्यांच्या जमीनीनुसार त्यात वाटा मिळाला. मगरपट्टा शहर 430 एकर जागेवर वसले आहे. पुणे शहरातील सुसज्ज आणि विकसित शहर म्हणून मगरपट्टा सिटीची ओळख आहे.

 

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp