digital products downloads

13 महिन्यांपासून आंदोलन करणारे शेतकरी नेते अटकेत, तंबूही हटवले: केंद्रीय मंत्र्यांसोबतच्या बैठकीतून परतणाऱ्या शेतकरी नेत्यांवर कारवाई

13 महिन्यांपासून आंदोलन करणारे शेतकरी नेते अटकेत, तंबूही हटवले:  केंद्रीय मंत्र्यांसोबतच्या बैठकीतून परतणाऱ्या शेतकरी नेत्यांवर कारवाई

  • Marathi News
  • National
  • Farmer Leaders Who Have Been Protesting For 13 Months Have Been Arrested, Their Tents Have Also Been Removed, Action Taken Against Farmer Leaders Returning From A Meeting With Union Ministers

चंदीगड/मोहाली1 तासापूर्वी

  • कॉपी लिंक

पिकांना हमीभावाच्या मागणीसाठी पंजाब-हरियाणाच्या शंभू व खानौरी सीमेवर १३ महिन्यांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकरी नेत्यांना पंजाब पोलिसांनी बुधवारी संध्याकाळी ताब्यात घेतले. केंद्रीय मंत्र्यांच्या पथकासोबतची बैठक आटोपून शेतकरी नेते शंभू व खानौरी सीमेवरील आंदोलनस्थळी परतत असताना त्यांना ताब्यात घेण्यात आले. या नेत्यांत सरवनसिंग पंधेर आणि जगजितसिंग डल्लेवाल यांचा समावेश आहे. ते गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून उपोषण करत आहेत.

वास्तविक बुधवारी शेतकरी नेते व केंद्रीय प्रतिनिधींमध्ये चर्चेचा सातवा टप्पा पार पडला. तथापि, शेतकऱ्यांच्या मागण्यांवर कोणतेही एकमत झाले नाही. केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान, प्रल्हाद जोशी आणि पीयूष गोयलही बैठकीला उपस्थित होते. ३ तासांच्या बैठकीनंतर शिवराज म्हणाले की, चर्चा सकारात्मक होत्या. आता ४ मे रोजी बोलू. बैठकीनंतर शेतकरी नेते परत येऊ लागले तेव्हा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. दरम्यान, पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष अमरिंदरसिंग राजा वारिंग आणि माजी मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांनी आरोप केला की, आप व भाजपने मिळून शेतकऱ्यांचा विश्वासघात केला.

शंभू बॉर्डर: चार हजार पोलिसांनी २ तासांत मोकळे केले आंदोलनस्थळ, २०० वर शेतकरी ताब्यात

  • गेल्या ७२ तासांपासून संगरूर आणि पतियाळामध्ये पोलिस आंदोलन दडपून काढण्याच्या तयारीत व्यग्र होते. शेतकरी नेत्यांना ताब्यात घेताच ४ हजार पोलिस कर्मचाऱ्यांनी कारवाई करण्यास सुरुवात केली. इंटरनेट बंद करण्यात आले. २०० हून अधिक शेतकऱ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. पतियाळाचे एसएसपी नानक सिंह म्हणाले की, गुरुवारी सकाळपर्यंत सीमा रस्ता मोकळा होईल.
  • पंजाब सरकारचे मंत्री तरुणप्रीत सौंद म्हणाले, आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत. शेतकरी केंद्राकडे मागण्या करत आहेत. शेतकऱ्यांना सीमेवर थांबवून केंद्राने पंजाबला इतर राज्यांपासून तोडण्याचा मार्ग शोधला आहे. यामुळे पंजाबचे मोठे नुकसान झाले आहे.
  • अटकेदरम्यान पोलिस आणि निदर्शक शेतकऱ्यांमध्ये झटापट झाल्याचे वृत्त आहे.
  • पंजाब सरकारचे मंत्री तरुणप्रीत सौंद म्हणाले, आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत. शेतकरी केंद्राकडे मागण्या करत आहेत. शेतकऱ्यांना सीमेवर थांबवून केंद्राने पंजाबला इतर राज्यांपासून तोडण्याचा मार्ग शोधला आहे. यामुळे पंजाबचे मोठे नुकसान झाले आहे.
  • शंभू-खानौरी सीमेवर शेतकऱ्यांनी आंदोलनासाठी बांधलेले शेड पोलिसांनी जेसीबी आणि बुलडोझर वापरून पाडले.

निदर्शनस्थळावरील शेड जेसीबीने पाडले

‘आप’वर नाराजी… संयुक्त किसान मोर्चाने म्हटले, आप सरकार शेतीत कॉर्पोरेट व परदेशी कंपन्यांच्या बाजूने आहे. ते संघ, भाजपला पाठिंबा देत आहे. बीकेयू (के) प्रमुख हरमीत सिंग म्हणाले की ही बैठक एक फसवणूक होती.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp