
नाशिकजवळ लहवित ते अस्वली स्थानकादरम्यान शनिवारी (दि.१९) रात्री साडेनऊच्या सुमारास ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड तसेच देवळाली कॅम्प ते नाशिकरोड रेल्वे स्थानकादरम्यान देवगिरी एक्स्प्रेसचा पेंटाग्राफ ओव्हरहेड वायरला घासल्याने रविवारी मध्यरात्री दीड वाजेदरम्य
.
खासगी भाड्यात ५० ते १०० रुपये वाढ
नाशिकरोडला रोज ३० ते ३५ हजार प्रवासी असतात. कारने ८०० तर बसने ३०० पासून ९०० रुपयांपर्यंत तिकिट होते. कार व खासगी बसभाड्यात प्रति प्रवासी नाममात्र ५० ते १०० रुपये वाढ झाली होती.

ग्राउंड झीरो – ६५ कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची ९ तास धावपळ
दुरुस्तीसाठी ३ टॉवर वॅगन, ६५ कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची ९ तास धावपळ सुरु होती. दुरुस्तीनंतर वंदे भारत रेकची तपासणी करून ती धावण्यायोग्य असल्याचे निश्चित केले. तत्पूर्वी आवश्यक साधने, ग्राइंडिंग टूल्स व मनमाडहून पूरक साहित्य घटनास्थळी पाठवण्यात आले. मुंबईहून पहिल्या दोन गाड्यांना इगतपुरीपासून एस्कॉर्टिंगची व्यवस्था केली. नाशिक- मनमाड दरम्यान सायक्लिक एस्कॉर्टिंग करून रेक सुरक्षेवर भर देण्यात आला.
नाशिक रोड व मनमाडला विशेष पीआरएस परताव्याची काउंटर सुरू
विविध ठिकाणी घोषणांद्वारे व एसएमएसद्वारे प्रवाशांना माहिती. नाशिक व मनमाड येथे अतिरिक्त तिकीट तपासणी कर्मचारी नियुक्त.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.