digital products downloads

1779 फोटो, 252 व्हिडीओ, लैंगिक छळ; खेवलकरला मुली पुरवण्यासाठी…, रुपाली चाकणकरांचे खळबळजनक आरोप, ‘रेव्ह पार्टीत…’

1779 फोटो, 252 व्हिडीओ, लैंगिक छळ; खेवलकरला मुली पुरवण्यासाठी…, रुपाली चाकणकरांचे खळबळजनक आरोप, ‘रेव्ह पार्टीत…’

Pranjal Khewalkar :  राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन प्रांजल खेवलकरबाबत मोठा गौप्यस्फोट केला. पुणे रेव्ह पार्टी प्रकरणातील आरोपी प्रांजल खेवलकर यांच्या मोबाईलमध्ये अनेक आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ सापडल्याचा आरोप, रुपाली चाकणकर यांनी केला. खेवलकरांच्या मोबाईलमध्ये 252 व्हिडीओ, तर 1487 आक्षेपार्ह फोटो आढळल्याचं चाकणकरांनी सांगितलं. तर 19 व्हिडीओ लैंगिक अत्याचाराचे असल्याची माहिती त्यांनी दिली. मुलींना ब्लँकमेलिंग करण्यासाठी या व्हिडीओ आणि फोटोंचा वापर झालाय. तर सिनेमात कामं देतो असं प्रलोभनं दाखवून लैंगिक शोषण केलं गेल्याचा आरोपही त्यांनी केला. खेवलकरसह यातील आरोपींची कसून चौकशी व्हावी, असे निर्देश पोलीस महासंचालकांना दिल्याचं चाकणकरांनी सांगितलं. खेवलकरच्या मोबाईलमधील महिलांच्या फोटोंपैकी काही फोटो त्याच्या मोलकरणीचे असल्याचाही आरोप चाकणकरांनी केलाय. खेवलकरनं शोषण केलेल्या महिलांचा शोध घेतला जात असून हा मानवी तस्करीचा प्रकार असल्याचा आरोप त्यांनी केलाय. (Obscene 1779 photos 252 videos sexual harassment provide girls to Pranjal Khewalkar rupali Chakankar sensational allegations pune rave party human trafficking)

काही गोष्टी सांगता येणार नाही, खूप संकोच होतोय. हे प्रकरण खूप गंभीर आहे. बऱ्याचशा व्हिडीओमध्ये खेवलकर स्वत: दिसून येत आहे. खेवलकरच्या मोबाईलमध्ये मोलकरणीचेही अश्लिल आणि आक्षेपार्ह फोटो आहेत. खेवलकर याच्या मोबाईलमध्ये सात मुलींचे नंबर आयुष नावाने सेव्ह करण्यात आले होते. आरूष नावाचा माणूस खेवलकर याला मुली सप्लाय करत होता. सिनेमात काम देतो, असे प्रथम तो सांगत असे. वैश्या व्यवसायासाठी बळजबरीने वापर करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसते, असेही चाकणकर म्हणाल्या. मुलींना विवस्त्र करून, नशा देऊन लैंगिक अत्याचार केल्याचे दिसते. या व्हिडीओच्या माध्यमातून मुलींना ब्लॅकमेल करण्यात आले. केवळ नागपूर, मुंबई, पुणे, ठाणे येथूनच नाही तर परराज्यातील मुलींना बोलवून अत्याचार केले गेले, असे तपासात समोर आल्याचे चाकणकर यांनी सांगितले.

दरम्यान पीडित मुलींनी समोर येऊन तक्रार करावी ज्यांच लैंगिक शोषण झालं आहे त्या मुलींनी समोर येऊन तक्रार द्यावी. त्यांचं नाव गोपनीय ठेवलं जाईल, असं आवाहन चाकणकर यांनी केलं. मानवी तस्करी, महिलांचा लैंगिक छळाचे धक्कादायक पुरावे मिळाले आहेत. खेवलकर मुलींशी फोनवर आपत्तीजनक बोलण्याचे व्हिडीओही मिळाले आहेत. त्याशिवाय रुपाली चाकणकर यांनी रोहिणी खडसेंबद्दल मला सहानुभूती वाटते, असं तेही यावेळी म्हणालेत. 

पुढे त्या म्हणाल्यात की, मानवी तस्करी विरोधी पथक या प्रकरणात काम करत आहेत. खेवलकरने 28 वेळा रूम बुक केल्या आहेत. तिथे मुलींशी अश्लिल चाळे करण्यात यायचे, असं त्यांनी यावेळी सांगितलं. मोबाईल, आर्थिक व्यवहार, मेलचा तपास करण्यात यावा. दोषींवर कठोरपणे कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. SIT च्या माध्यमातून योग्य तपास व्हावा, असंही त्या म्हणाल्यात. 

FAQ (सुरक्षित आणि गोपनीयतेच्या दृष्टिकोनातून तयार केलेले प्रश्न)

1. रुपाली चाकणकर यांनी प्रांजल खेवलकर प्रकरणाबाबत काय सांगितलं?

रुपाली चाकणकर, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन प्रांजल खेवलकरच्या मोबाईलमध्ये 252 व्हिडिओ आणि 1487 आक्षेपार्ह फोटो सापडल्याचा गौप्यस्फोट केला. यामध्ये 19 व्हिडीओ लैंगिक अत्याचाराचे असल्याचा आरोप त्यांनी केला.

2. प्रांजल खेवलकरच्या मोबाईलमध्ये काय आढळलं?

खेवलकरच्या मोबाईलमध्ये 252 व्हिडीओ, 1487 आक्षेपार्ह फोटो, यामध्ये 19 लैंगिक अत्याचाराचे व्हिडिओ, मोलकरणीचे अश्लील फोटो, आणि मुलींना ब्लॅकमेल करण्यासाठी वापरलेले पुरावे आढळले.

3. या प्रकरणात मानवी तस्करीचा आरोप का लावण्यात आला?

खेवलकरच्या मोबाईलमध्ये सात मुलींचे नंबर “आयुष” नावाने सेव्ह होते, ज्याने मुली सप्लाय केल्याचा संशय आहे. परराज्यातील मुलींना बोलवून अत्याचार केल्याचे तपासात समोर आल्याने हा मानवी तस्करीचा प्रकार असल्याचा आरोप आहे.

4.पीडित मुलींना काय सल्ला देण्यात आला?

पीडित मुलींनी समोर येऊन तक्रार करावी, जेणेकरून त्यांना संरक्षण देण्यात येईल, असं आवाहन रुपाली चाकणकर यांनी केलं.

5. पोलिसांना काय निर्देश देण्यात आले?

खेवलकरसह सर्व आरोपींची कसून चौकशी करण्याचे निर्देश पोलीस महासंचालकांना देण्यात आले आहेत.

 

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp