
Matheran Tourism Closed : माथेरान हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. राज्यातून तसेच देशभरातुन पर्यटक माथेरानमध्ये फिरण्यासाठी येतात. तुम्ही माथेरानला फिरायला जायचा प्लान करत असाल कर लगेच कॅन्सल करा, कारण, 18 मार्च 2025 पासून माथेरान बेमुदत बंद असणार आहे. पर्यटकांच्या फसवणुक थांबवण्यासाठी माथेरानकर एकवटले असून त्यांनी माथेरान बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
माथेरानमधील प्रवेशद्वार असलेल्या दस्तुरीवर काही घोडेवाल्यांकडून पर्यटकांची दिशाभूल,फसवणूक केली जाते याला आळा घालण्यासाठी माथेरानकरांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला मात्र त्याला यश न आल्यामुळे अखेर माथेरान बचाव संघर्ष समितीने माथेरान बंदचे हत्यार उपसले आहे जो पर्यंत माथेरान प्रशासन फसवणुकीचे धंदे बंद करत नाहीत तोपर्यंत माथेरान बेमुदत बंदचे आवाहन करण्यात आले आहे. आज प्रशासना बरोबर झालेली चर्चा निष्फळ ठरल्याने माथेरानकर बंदच्या भूमिकेवर ठाम आहेत.
रायगड जिल्ह्यातील सर्वात टुमदार पर्यटनस्थळ म्हणून माथेरानचा नावलौकिक आहे.या पर्यटनस्थळावर उदरनिर्वाहासाठी अनेक भागातुन लोक काम करण्यासाठी येतात.यामध्ये कर्जत तालुक्यातून मोठ्या प्रमाणात आपली उपजीविका करण्यासाठी हातरीक्षा ओढणारे,कुली काम करणारे,घोडेवाले जे सुद्धा येतात.यातील काही घोडेवाल्यांकडून पर्यटकांची दिशाभूल,फसवणूक केली जाते असा आरोप माथेरानकर करत आहेत. येथे आलेल्या पर्यटकाने तर येथील आपबीती सोशल मीडियावर टाकली.यामुळे त्याच्या वाईट प्रतिक्रिया उमटू लागल्या.
सुंदर माथेरानची बदनामी करणाऱ्या घोडेवाल्यांवर येथील प्रशासनाने जरब बसवावी. यासाठी हे माथेरान बेमुदत बंदचे आवाहन केले आहे.27 फेब्रुवारीला महसुल विभाग,नगरपालिका,वन विभाग आणि पोलीस प्रशासनाला या आंदोलनाचे निवेदन देण्यात आले होते . आज यासंदर्भात बैठक बोलावण्यात आली होती परंतु माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीने ज्या मागण्या केल्या होत्या त्या कडे दुर्लक्ष झाल्याचं समितीच्या लक्षात आलं.
कुठल्याच प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहिले नसल्याने माथेरान बचाव संघर्ष समितीने नाराजी प्रकट केली.19 दिवसांचा वेळ देऊनही प्रशासनाने कोणतीच कारवाई केली नसल्याने अखेर नाईलाजास्तव माथेरान बचाव संघर्ष समितीने माथेरान बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून उद्या मंगळवार (दि.18) पासून माथेरान बेमुदत बंद राहणार आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.