digital products downloads

2 लाखांचा iPhone घेण्यापेक्षा गाय किंवा म्हैस घ्या; गोकुळच्या अध्यक्षांची डोळे उघडणारी पोस्ट व्हायरल

2 लाखांचा iPhone घेण्यापेक्षा गाय किंवा म्हैस घ्या; गोकुळच्या अध्यक्षांची डोळे उघडणारी पोस्ट व्हायरल

Gokul Chairman Naved Mushrif Viral Post: आयफोन 17 लाँच झाल्यानंतर तो कधी बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार याची तरुणांना उत्सुकता होती. शुक्रवारी जेव्हा तो दिवस आला तेव्हा तरुणांनी आयफोन 17 खरेदी कऱण्यासाठी अक्षरश: उड्या मारल्या. अनेकजण तर रात्री 12 वाजल्यापासून अॅप्पल स्टोरअरच्या बाहेर रांग लावून उभे होते. आयफोन 17 हातात आल्यानंतर त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. धक्कादायक म्हणजे मुंबईत तर तरुणांची चक्क हाणामारी झाली. यादरम्यान सोशल मीडियावर अनेकांनी खरंच इतका महागडा फोन घेण्याची गरज आहे का? अशी विचारणाही केली. त्यातच गोकुळचे अध्यक्ष नावेद मुश्रीफ यांनी तरुणांची डोळे उघडणारी एक पोस्ट शेअर केली आहे. 

Add Zee News as a Preferred Source

सध्या मार्केटमध्ये आयफोन 17 घेण्यासाठी तरुणांच्या उड्या पडू लागल्या आहेत. यासंदर्भात कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष नावेद मुश्रीफ यांनी सोशल मीडियावर केलेली पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे. नावेद मुश्रीफ यांनी आपल्या पोस्टमध्ये खरी गुंतवणूक तीच जी आपल्याला भविष्यात उत्पन्न देते असं सांगत आरसा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. 

2 लाखांचा रुपयांचा आयफोन खरेदी करण्यापेक्षा 2 लाखांची म्हैस किंवा गाय विकत घेतली तर ती आपल्याला कायमस्वरूपी उत्पन्न देऊ शकते असं त्यांनी सांगितलं आहे. त्यांनी पोस्टमध्ये फोटो शेअर करत 2 वर्षांनी आयफोनची किंमत कमी होईल, पण म्हैस, गाय 4 लाखांपेक्षा अधिक उत्पन्न देईल असं सांगितलं आहे. 

मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष नावेद मुश्रीफ यांनी केलेली सोशल मीडियावरची पोस्ट सध्या चर्चेचा विषय बनली आहे. 

 

FAQ

1) आयफोन 17 कधी लाँच झाला?
आयफोन १७ मालिकेची घोषणा ९ सप्टेंबर २०२५ रोजी ‘Awe Dropping’ इव्हेंटमध्ये झाली. प्री-ऑर्डर्स १२ सप्टेंबरपासून सुरू झाले आणि डिव्हाईसेस १९ सप्टेंबर २०२५ पासून उपलब्ध झाली. ही मालिका iPhone 17, iPhone Air, iPhone 17 Pro आणि iPhone 17 Pro Max समाविष्ट आहे. 

2) . आयफोन १७ मालिकेत कोणत्या मॉडेल्स आहेत? 
 iPhone 17: बेस मॉडेल, सर्वात परवडणारे फ्लॅगशिप.  
iPhone Air: नवीन स्लिम मॉडेल, फक्त ५.६ मिमी जाडीचे (आधीचे रेकॉर्ड iPhone 6 चे ६.९ मिमी होते).  
iPhone 17 Pro: प्रोफेशनल फीचर्ससह.  
iPhone 17 Pro Max: सर्वात मोठे आणि प्रीमियम. ही मालिका स्लिमर डिझाईन आणि सुधारित बॅटरी लाईफवर फोकस करते. 

3) आयफोन १७ ची मुख्य वैशिष्ट्ये कोणती?  
डिस्प्ले: सर्व मॉडेल्समध्ये Always-On आणि ProMotion (१२०Hz रिफ्रेश रेट).  
कॅमेरा: बेस iPhone 17 मध्ये सर्व ४८MP कॅमेरा, ज्यात ४८MP Fusion Main कॅमेरा आणि इंटिग्रेटेड २x टेलिफोटो लेन्स. प्रो मॉडेल्समध्ये ७x ऑप्टिकल झूम आणि १००x डिजिटल झूम.  
प्रोसेसर: A19 Pro चिप (३nm प्रोसेस).  
इतर: व्हॅपर चेंबर थर्मल डिझाईन, अंडर-डिस्प्ले Face ID (प्रो मॉडेल्समध्ये), Wi-Fi 7 आणि Bluetooth चिप्स. 

4) आयफोन 17 ची किंमत किती?
iPhone 17: $७९९ पासून (सुमारे ₹६७,०००).  
iPhone Air: $८९९ (सुमारे ₹७५,५००).  
iPhone 17 Pro: $१,०९९ (सुमारे ₹९२,५००).  
iPhone 17 Pro Max: $१,१९९ (सुमारे ₹१,०१,०००).
भारतातील अंतिम किंमती कस्टम ड्युटी आणि करांमुळे जास्त असू शकतात. अधिक माहितीसाठी apple.com/in वर तपासा.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp