
कल्याण पूर्वेतील नांदिवली परिसरात खासगी रुग्णालयात रिसेप्शनिस्ट मराठी तरुणीला झालेल्या मारहाणीप्रकरणी अटक करण्यात आलेल्या गोकुळ झा आणि त्याचा भाऊ रंजित झा यांना कल्याण न्यायालयाने २५ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. सुनावणीदरम्यान गोकुळ झा याने न्
.
परप्रांतीय आरोपी गोकुळ झा याने एका मराठी तरुणीला सोमवारी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तिच्या अंगावरील कपडे फाटले आणि ती गंभीर जखमी झाली. पोलिसांकडून वाचण्यासाठी गोकुळ झा केस कापून वेगळ्या पोशाखात फरार झाला होता. मात्र मंगळवारी रात्री वसार गावामधील शेतातून मनसे पदाधिकारी योगेश गव्हाणे यांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. बुधवारी पोलिसांनी दोघा भावांना न्यायालयात हजर केले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी न्यायालय परिसरात कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
तरुणी रुग्णालयात दाखल
रिसेप्शनिस्ट तरुणीनेच आधी माझ्या सुनेच्या कानशिलात लगावली. त्यानंतर हा प्रकार घडला, असा आरोप गोकुळ झाच्या आईने केला आहे. हा नवा व्हिडिओ समोर आला आहे. मात्र तरुणीने आरोप फेटाळले असून गोकुळ झाने प्रथम शिवीगाळ व मारहाण केल्याचे सांगितले. जखमी तरुणीवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिच्या मानेवर, पायावर व छातीवर दुखापत झाली आहे. सध्या तिची प्रकृती ठीक असून उपचार सुरू असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
आरोपीचा गोंधळ नाही
आरोपीने कोर्टात गोंधळ घातला नाही, तो त्याची बाजू मांडत होता. त्याचे म्हणणे होते की, मी गुन्हा केला, मग माझ्या भावाला कशाला पकडले? न्यायाधीशांनी त्याला सांगितले, तू जे बोलतोय त्यामुळे सरकारी कामात अडथळा येतोय. – संजय धनके, आरोपीचे वकील
गेल्या आठवड्यात जामीन
गोकुळ झावर पूर्वीचे तीन गुन्हे दाखल आहेत. एका मारहाणीच्या गुन्ह्यात कोसळेवाडी पोलिसांनी अटक केली होती. मागील आठवड्यात तो बेलवर सुटून आला होता. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. -अतुल झेंडे, पोलिस उपायुक्त
आरोपीवर चौथा गुन्हा
आरोपी कोर्टात अरेरावी करत होता. त्या वेळी न्यायाधीशांनी त्याला कोर्टाच्या कामात हस्तक्षेप करतो म्हणून गुन्हा दाखल होईल, अशी तंबी दिल्यानंतर तो शांत झाला. हा चौथा गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे. – हरीश नायर, फिर्यादीचे वकील
आरोपीवर दरोड्याचे गुन्हे
गोकुळ झा हा सराईत गुन्हेगार आहे. कोळशेवाडी, उल्हासनगर या परिसरात दरोड्यासह मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत. नांदिवली परिसरामध्ये स्थानिक फेरीवाल्यांना धमकावून त्यांच्याकडून गोकुळ झा हप्ते वसूल करत असल्याचा आरोप आहे. गोकुळ झा हा चार दिवसांपूर्वीच तुरुंगातून सुटला होता. त्याचा एक जुना व्हिडिओ समोर आला आहे. यात तो एकावर चाकूने वार करीत असल्याचे दिसत आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.